Nojoto: Largest Storytelling Platform

मी उगाच माझी स्वप्ने तुडवीत चालत आहे वाट चढत आहे आ

मी उगाच माझी स्वप्ने तुडवीत
चालत आहे वाट
चढत आहे आयुष्याचे
 घाटावरती घाट 
 आस मनाला एकच
होती
यश घेऊन येईल पहाट

सरता सरेना रात काळी
मेहनत काळ्या रंगाची
जगत आहे आज जिदगी 
फुटक्या रंगीत ढंगाची

पैसा जैसा वैरी झाला
मिळेच ना तो मला
खस्ता ठेचा खाऊन रक्त
वाहिले जिंदगी तुला 

खेळ माझा खेळत राहील 
जरी मी हरलो किती 
धमक ठेवतो मनगटात या 
जिंकीन तुला जिंदगी 
तुझी न मजला भिती

©कवी. शशि शिनगारे
  जिंदगी मी तुला भित नाही

जिंदगी मी तुला भित नाही #जीवनअनुभव

128 Views