Nojoto: Largest Storytelling Platform

रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही ना

रंग..

रंग आयुष्याचे
कधी फिकट ,कधी गडद
सांगूनही नाहीचं उमजायची
आपोपली सनद
उधळायचे हास्य अन्
कवटाळायचे दुःखाला
कितीही मिळाले तरी
पुरे होते का कधी कोणाला
मी ,मी करत असताना
करतोचं घात आपणही
मुखवटा फक्त बाहेरच्यांसाठी
कायं आहे जाणतोचं आत आपणही
पकडता नाही आले तरी
सांभाळावे मन जरासा
दर्पणाला तरी दाखवावा
चेहरा आपला खरासा
मावळतीच्या रंगातही
लालचुटुक गुलाब उमलावा
अंतरीच्या देव्हाऱ्यात
खरेपणाचा एक दिवा तेवावा
जाताना नसला ओघळला अश्रू जरी
असूया मात्र असू नये
रंग असावेत खरेखुरे
बरे झाले म्हणून...
कोणी ,कोणी हसू नये.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Colors रंग..

रंग आयुष्याचे
कधी फिकट ,कधी गडद
सांगूनही नाहीचं उमजायची
आपोपली सनद
उधळायचे हास्य अन्
कवटाळायचे दुःखाला

#Colors रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला #शायरी

288 Views