तुझ्याचसाठी....❣️❣️❣️ दारी बहरला मोगरा तुझ्याचसाठी मनी सुगंध तोच खुलला तुझ्याचसाठी गीत उमटले ओठी तुझ्याचसाठी धडधड हृदयाची चाले फक्त तुझ्याचसाठी रात्र ही थांबून राहिली तुझ्याचसाठी नभी चांदणे पसरले तुझ्याचसाठी मंद वारा वाहू लागला तुझ्याचसाठी सागरी किनारा वाट पाहे तुझ्याचसाठी रिमझिम पाऊस हि पडे तुझ्याचसाठी ओढ लागली भेटीची चातका सारखी तुझ्याचसाठी मी न माझी राहिले आहे फक्त तुझी आणि तुझ्याचसाठी जन्मोजन्मी हे नाते जपले मनी तुझ्याचसाठी ©Mayuri Bhosale #तुझ्याचसाठी