ती आणि पाऊस ______________________________________ पावसात मला आज फक्त तुच दिसत होतीस काय झाले कळाले नाही अचानकच तुला, बेधुंद भिजण्यासाठी मलाही ओढत होतीस! होऊनी लहान ये रे-ये रे पावसा म्हणत होतीस पाऊसही बघ ना आज कुणाचच ऐकत नव्हता तरीही तु भिजण्याचा उगाच हट्ट करत होतीस! माहीत नाही तु आज असं का वागत होतीस त्याच्यापासुन वाचवायचा प्रयत्न करत होतो, तु मात्र त्यातच रमण्याचा प्रयत्न करत होतीस! ______________________________________ विजय सोनवणे #raining