तिमिरातून तेजा कडे एक दिवा कोरोना चा जो अंधकार पडला आहे त्यासाठी ... माहीत आहे दिवा लावून कोरोना जाणार नाही पण जे कोरोना जाण्यासाठी मेहनत करत आहेत त्याच्या जिद्दी नि मेहनती साठी... ज्यानच्या मनात निराशा न भीतीचा जो अंधकार पडला आहे त्यांच्यात आशेचा प्रकाशरुपी किरण यावा यासाठी... संकट रुपी अंधकार जाण्या साठी घरात बसून कायदा न सुवेवस्थेचं तंतोतंत पालन करणाऱ्या माझ्या जनताजनार्धनासाठी... कोरोना मुळे ज्यांच जगणं मुश्किल झाला आहे त्यांच्या साठी दान धर्मा करून जीवनाश्यक गोष्टी पुरवून त्याना मदतीचा हात देणाऱ्या साठी ... कोरोना पेक्षा जास्त धर्मांध शक्तीचा वायरस पसरत असताना एकजुटीचा संदेश देणाऱ्या न बंधू प्रेमाने राहणाऱ्या साठी... एक ज्ञानाचा दिवा त्यांच्या साठी पण जे आज यागोष्टीचा विरोध करून सगळे नेगेटिव्ह गोष्टी पसरावतील... दिवा लावायचा सोडून फटाके किंवा काही तरी तुफानी करतील... दिव्या मागचा अर्थ सोडून पुरतं अनर्थ करतील.. खालचा माझ्या सोसायटी मधील फोटो यासाठी share करत आहे की देशात सगळेच पढे लिखे गवार नसतात... खूप असे पण आहेत जे प्रत्येक गोष्टीत आशेचा नवा किरण शोधतात... आपल्या जिद्द न मेहनतीने कोरोना सारख्या हजार संकटाना हरवून देश घडवतात... ©रामदास नरवाडे #gocorona #दिवा #India #दिवा #मराठी #gocorona