वाटले नव्हते असे कधी, त्या वळणावर भेट होईल पुन्हा एकदा. जुन्या आठवणीत पुन्हा रमून जाऊ, ज्या वळणावर आमची भेट व्हायची अनेकदा. व्हायचे रुसवे फुगवे कित्येकदा, चूक माझीच उशिरा मीच सदासर्वदा. सांगायची कितींदा मी नाही भेटणार पुन्हा, दुर्लक्ष करायचो मी,वाटायचं हीचा रोजचाच बहाणा. पण एक दिवस खरेच असे घडले, ती नाही आली भेटायला,शब्द तिचे खरे ठरले. दिवसामागून दिवस जाताना,फेरी मारायचो मी त्या वळणावर, मनी एकच आस,ती पुन्हा भेटेल,सोडून गेली ज्या वळणावर.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील