ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती, तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती , तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन आहोटी, तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं . सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा , तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस , माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे , स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?