#उन्हाचे साम्राज्य.... जेव्हा साम्राज्य उन्हाचे सारीकडे पसरते तेव्हा आश्रयाला सावलीच्या कुणी मग जाताना दिसते मुष्किल होते मग बाहेर फिरणे ते भयाण कडक ऊनच नडते पिण्यासाठी नीर घ्यावे मग जेव्हा उन्हात पाऊल अडते झाडांखाली घेऊ जेव्हा आश्रय उन्हात फिरताना या झाडांना थंड ठेवते कोण बरे ते न कधी मज कळते खावयास मिळतील का कुठे काजूगर ते नवे रसाळ गऱ्यांसाठी प्रसिद्ध असे फणसाचे झाड मग सर्वांना हवे जांभुळ नी करवंदे परिपक्व ती दिसावी वाट वाकडी लालसर रानावनातून हसावी डोंगरात असलेल्या त्या आंबराईत मग चक्कर मारावी पूर्ण पिकलेल्या आंब्याची चव चाखावी रानमेवा तो मिळुनी खावा अन् नात्यांची गम्मत वाढवावी आठवणी या सोनेरी क्षणाच्या जपाव्या हळूवार मनात अन् आयुष्याला नवी पालवी जोडवावी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्यपालवी