#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिला जोवर काही फारस येत नसे तोवर हे..ती जसजशी मुरायला लागली संसारात तस तशी ती नावडती होत गेली सासूची ...त्यात हिचा स्वभाव, झोकुन देण्याचा...जे करेल ते निटनेटके...निगुतीने, वेळेत..साहित्याची जाण उत्तम, रांगोळी सुंदर काढत असे, घर छान ठेवी..सगळ्यांशी लाघवीपणे वागत बोलत असे. सगळ्यांची लाडकी व्हायला इतकं पुरेसं होतं की..पण तिथुन मग सासूबाईंची कुरबुर सुरु झाली.