Nojoto: Largest Storytelling Platform

कायमची साथ तू, तू माझाच श्वास, आयुष्य तू माझं, आयु

कायमची साथ तू, तू माझाच श्वास,
आयुष्य तू माझं, आयुष्यात तूच खास,
कर्तव्यात नेहमी व्यस्त तू, प्रपंचाच्या मागे,
विणते तूच साऱ्यांशी, मायेचे अनोखे धागे,
स्वतःला दुय्यम ठेवत, आमची आवड जपणं,
तरी शांत, संयमाने, सतत हसत दिसणं,
इतकं कुणी कुणासाठी असं, निरपेक्ष होऊन करतं,
इतरांना खूश ठेवत, तुला नक्की काय मिळतं ??
विचारतं कोण तुझ्या मनाला, कसला अधिकार ही नाही,
मनावर होणाऱ्या वारांचा, तुझ्याकडून प्रतिकार ही नाही,
समजून तूच घेणं नेहमी, आम्ही फक्त गृहीत धरायचं,
तरीही अळीमिळी गुपचिळीने, तू साऱ्यांचं सारं करायचं,
डोळा पाणी येईल कधी, आलं तर त्याला वाहुदे,
निवांत बस दोन क्षण, काम आज तरी राहुदे,
प्रेमाचं वलय निर्माण करत, आम्हाला त्यात घेरतेस,
आई या एका शब्दात पूर्ण, विश्वाला आपलं करतेस,
आईविना हा संसार काही, पुढे जात नसतो बघ,
आजचा हा दिवस तरी, तू तुझा म्हणून जग...
#HappyMother'sDay #मातृदिन
- स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar