जा मित्रा जा नको दाखवू औदार्य तू शांतपणे मुक्त हो उरले सुरले प्रश्न त्यांचे काय उत्तर सांगा देश भक्त हो दोन मुले देशाची एक तिथे त्या सीमेवर एक ईथे या खुर्चीवर गंमत पहा सीमेवरचा मृत्यू घेई खुर्चीवाल्याच्या मर्जीवर राजकारणी वक्तव्यात वार्ताहर ही झाले गुंग हाय हाय करण्यामधे मानवतावादी संस्था दंग आले उठून कुणी तरी आणि केला पैसा जमा कोण पहातोय कुठे तो पैसा अन कुणाच्या खाती जमा शौर्य नको दाखवू आता वाटे या देशाला ती नसे गरज मृत मनाने लावतो बत्ती लाज मनाची नसे खरंच माय बाप बहिण भाऊ बायको पोरं नात्यांची सा-या होई होळी इतरा त्याची किंमत कुठली येथे का झेलसी त्यांच्यासाठी गोळी किती ही बोललो तरी तू सैनिक हाडांचा तुच रे देशभक्त बाकी वल्गनांचे पुतळे आहेत षंढ आणि षंढ फक्त नंदसुत #NojotoQuote