Nojoto: Largest Storytelling Platform
arunmundhe4109
  • 8Stories
  • 8Followers
  • 72Love
    772Views

अरुण मुंढे

  • Popular
  • Latest
  • Video
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

White तुझ छेडून हा वारा
बघ अजूनही धुंद आहे..
मी मिटताच डोळे तू समोर
हा कसला छंद आहे...

तू समोर ठाकता ...बघ 
चांदण्याचाही प्रकाश मंद आहे...
आजच्या ह्या सांजेला..बघ
रातराणीलाही तुझाच गंध आहे...

©अरुण मुंढे #love_shayari  मराठी शायरी लव

#love_shayari मराठी शायरी लव #मराठीशायरी

099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

White तू गजरा माळलेला केसातला
मी त्यात गुंतलेला दोरा ग...
तू पूर्ण पुस्तक कवितांचे
अन् मी कागद कोरा ग...

तू श्रावणातला इंद्रधनु
मी त्यात कोसळणाऱ्या धारा ग...
तू रात गुलाबी चांदण्याची
मी त्यातील उनाड वारा ग..

तू चंद्र पौर्णिमेचा 
 त्यात मी लूकलुकणारा तारा ग..
तू साऱ्याचेच उत्तर माझे 
अन् मी प्रश्नांचा पसारा ग....

©अरुण मुंढे #love_shayari
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

महाराष्ट्राच्या मातीतला जन्म अमुचा
आम्हा कशाला हवी कुणाची प्रेरणा..
सूरवात कशी करावी वाटत असेल
तर त्याच उत्तम उदाहरण किल्ले तोरणा..

सामर्थ्याचा उत्तम उदाहरण
आजही उभा तो प्रतापगड..
अफजल्याला उभा फाडून 
पायथ्याशी पुरल त्याच धड...

कधी अडचणींना घबरलात तर
विशाळगडाची याद करा ताजी..
मरणालाही आडवाटेत थांबवून
प्रणनिशी लढले होते अमुचे बाजी..

नवनिर्माणाची असेल ध्यास 
तर जगात काहीच नसतं जड..
याच उत्तम उदाहरण असेल 
तर महाराजांचा राजगड..

आयुष्यात सर्वांच्याच येतात दुःख
त्यांना ताठ मानेनं असतं नडायच..
आठवून प्रताप सिंहगडाचा
तानाजी रावांसारखं लढायच..

जेव्हा सर्वच संपल अस वाटेल
तेव्हा रायगडाला जाऊन राहायचं...
महाराजांच्या संपूर्ण  आयुष्याला
एक प्रेरणा म्हणून पहायचं....

©अरुण मुंढे
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

बघ आभाळ आल सजून
त्यात रेंगाळले चांदणे अजून..

ती रातराणी ही बहरलेली
त्यात हवा ही शहारलेली...

ते रूप तुझ सजलेलं
पाहून चांदणं ही लाजलेल....

सांग सखे यात काय चूक माझी
याद तुझी अजून ओंजळीत ताजी.....

©अरुण मुंढे #ArabianNight
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

तीला कविता येत नाही 
उधळते डोळ्यातूनी बरेच,
मात्र काही कळत नाही...

साऱ्या प्रश्नांवर ती अबोल
बोलके तेवढे डोळे तिचे,
 उत्तर मात्र मिळत नाही...

तीच ते स्वच्छंदी वागणं
अन् मी हरवलेला असा,
की एक क्षण ही ढळत नाही ....

म्हंटल गुंफूनी  शब्दांना
समजवावे भावना तिला,
मात्र कविताही तिला कळत नाही...

©अरुण मुंढे
  #standout
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

तुला भेटून कळते  
काय असते चांदणे..
कसे कायम तुझ्या
देहात वसते चांदणे...

कधी जमलेच नाही
तुला शब्दात बांधणे..
असे तू काळोख्या 
रात्रीत  चकाकणारे चांदणे..

त्या गहिऱ्या रातीत
 रातराणीचे ते रांदणे..
असे न गवसणारे
तू नभीचे चांदणे..

तसे रात्री नभी 
लाखो दिवे पाहतो मी..
तुझ्या इतके कधीही 
लख्ख नसते चांदणे

©अरुण मुंढे
  #sharadpurnima
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

सांज त्या वेळेला
सावर रे मना..
राधेच्या त्या रुपास,
भुललेला तो कान्हा...

पैंजनांचा तो आवाज
अन् तिचा तो साज..
विरान या मनावर,
अलगद केलं बघा  राज..

चालता चालता तिने 
मागे वळून पहावं..
गहिऱ्या डोळ्यांत तिच्या,
हरवून मी जावं...

मोकळ्या केसात तिच्या 
अलगद हात फिरवावा...
माळलेल्या केवड्याच्या गंधात,
मी भान हरवावा...

सांज ती सरली....
रात ती भरली....
निघुनी ती गेली,
अन् आठवांत उरली...

©अरुण मुंढे #Journey
099b7dc5d22792535bc7c46bc5b05961

अरुण मुंढे

चांदणं त्या रातीला,
रातराणीच्या सुगंधात न्हाव...
बनून तो एक तारा,
चांदण्याकडे पाहत रहावं..

अनुभवण्यास सारे,
ते चांदणे ओंजळीत घ्यावे..
ओंजळीतून निसटते क्षण,
त्या गारव्यात उधळून द्यावे..

चांदण्याला साथ देण्या,
गुलाबी थंडीत रात न्हावी..
प्रेम देण्या जन्म घ्यावा,
प्रेमा इतकीच बात व्हावी..

©Arun Mundhe


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile