Nojoto: Largest Storytelling Platform
prasadgite5511
  • 64Stories
  • 30Followers
  • 481Love
    417Views

Prasad Gite

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

परिस्थितीची तक्रार करणारे, 
इतिहास जमा होतात.
तर परिस्थतीशी लढा देणारे,
इतिहास घडवतात.

©Prasad Gite #chai
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

व्यथा...
कोणी गट बांधले 
कोणी तट बांधले,
आमच्या नशिबी मात्र
आभाळ फाटले.
सत्तर हजार कमविणाऱ्यांनी
साठीत मोर्चे काढले,
भाव मिळाला नाही म्हणून
कांदे चाळीत आमच्या सडले.
दुःख काय सांगू दादा
आभाळा येवढे मोठे,
दारिद्रय दावणीला बांधले,
तर संकट पाचीला पुजले.
जगाचा म्हणतात पोशिंदा आम्हाला,
पण आम्हीच झालो पोरके,
कोणी उरला नाही वाली,
सगळे सत्तेचेच कोल्हे.
टीआरपी च्या नादामधी,
आवाजही आमचा दबला.
बांधावरला प्रश्न आमचा,
बांधा वरच रडला.
बाप आमचा शेतकरी म्हणून 
वाटायचा एकेकाळी अभिमान,
आज त्याच बापाच्या डोळ्यात
दिसतात आसवांचे बांध.
कधी सरल हा काळ ?
कधी बहरेल आमचं रान ??
तूच सांग ना रे पांडुरंगा,
परत हासल का माझा बाप ??

©Prasad Gite #Sunrise
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

तू कहे अगर तो...

तू उड़ना चाहे कभी अगर,
तो तेरे पंख मैं बनूँगा ।
तेरी हर एक उड़ान का,
हौसला मैं बनूँगा ।
तेरे सपनों के दरिया का, 
सागर मैं बनूँगा ।
तेरी हर ख्वाइशों का,
टूटता तारा मैं बनूँगा ।

तू कहे अगर तो...
तेरी हर तस्वीर का,
आयना मैं बनूँगा ।
छोड़े जो साथ तकदीर तेरी,
तो तेरा साथ मैं बनूँगा ।
तेरी हर एक जितका ,
जश्न मैं बनूँगा ।
तेरी हर एक हार का,
जिम्मा मैं बनूँगा ।

तू कहे अगर तो....
तेरे हर एक सवाल का,
जवाब मैं बनूँगा ।
तेरे हर एक हुक्म का,
फतवा मैं बनूँगा ।
दुनिया की हर ख़ुशी को,
तेरे कदमो में सजाऊंगा
तू बनजाये एक बार 
शहजादी मेरे जहाँ की जो,
तेरा शहज़ादा मैं बन जाऊँगा ।

©Prasad Gite
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

उत्तर मिळत नाही..

जगण्या मरण्याचा ह्या 
रणांगणात डाव हरलो काही,
तर प्रश्न उठले प्रयत्नावर माझ्या,
कष्टाची कोणाला जाण नाही.
काळ आणायचा होता मला
म्हणून जागलो होतो कैक राती,
पण स्वप्न तुटली काय माझी, 
तर अस्तित्वाला माझ्या
किंमत उरली नाही.
खरच जिंकनच असत महत्वाच,
कारण जिंकण्या शिवाय 
जगण्यालाही अर्थ मिळत नाही.

म्हणतात तारुण्य असत मोक्याच,
पण धोक्यांशिवाय काही मिळाल नाही.
जपलं होत एक नातं प्रेमाच,
पण तिनेही साथ दिली नाही.
वचने देऊन सात जन्माची,
सात पावलेही साथ चालली नाही.
परिस्थिती अन प्रेमामध्ये 
प्रेमाला किंमत मिळत का नाही ??

माणूस असुद्या कितीही चांगला
पण पैश्याविना त्याला काहीच मोल नाही.
खरच पैसा असतो का इतका महत्त्वाचा,
मग शरीराला एखादा खिसा का नाही ??
लग्नासाठी जावई शोधणाऱ्या बापाला,
२४ वर्षाच गणित कळत कस नाही ??
सारेच करतात अपयशाची चर्चा
पण प्रयत्नांवर कोणी बोलत का नाही ??
नाक्या वरच्या टोमणे मारणाऱ्याना
दुसरे काम का मिळत नाही ??
कोडी आहे कैक मनी माझ्या,
पण गाठ काही सुटत नाही.
लोकही बोले अधुर मधुर वाणी
पण तारुण्याच्या ह्या प्रश्नांना 
उत्तर कोणी देत नाही...

 कवी. प्रसाद गिते

©Prasad Gite #writer
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

#बालपण

मावळणारा प्रत्येक सूर्यास्त 
आता अनुभव देऊन जातो,
स्वप्नांना माझ्या आता
अपेक्षांचा भार असतो,
रात्र जातेय विचारांत,
दिवस कष्टात जातो.   
तारुण्याची होती हौस मनाला,
आता पुन्हा देईल ते बालपण,
असा देव शोधू पहातो....

©Prasad Gite #Childhood
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

#बालपण

मावळणारा प्रत्येक सूर्यास्त 
आता अनुभव देऊन जातो,
स्वप्नांना माझ्या आता
अपेक्षांचा भार असतो,
रात्र जातेय विचारांत,
दिवस कष्टात जातो.   
तारुण्याची होती हौस मनाला,
आता पुन्हा देईल ते बालपण,
असा देव शोधू पहातो....

©Prasad Gite #Childhood
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

Relation = Failed
Dreams = Failed
Business = Failed
Money = Failed


Ab khone ko kuchh bhi nhi rha,
Par pane ko bahut kuchh hai..

©Prasad Gite #Top
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

पता नही आखिर 
ए जिंदगी हमसे चाहती क्या है ??
हम बार बार चलनेकी कोशिश करते है 
पर वो हरबार हमे गिराने की कोशिश में होती है ।

©Prasad Gite #lonely
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

*ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली. इकडून तिकडून पैसे आणून रोपे आणली, पेपर आणले आणि डोळ्यात स्वप्न साठवून टोमॅटो लावली. लावून १ महिनाही झाला नव्हता तर अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. आपलं १ वर्षाच बाळ पाण्यात फिजल्यावर जी आपली हालत होईल तशीच हालत ती टोमॅटोची झाडी बघून शेतकऱ्यांची होत होती. झाडे जमिनीला टेकली म्हणून एका घाई पैशाचा विचार न करता बांधणी केली. काही दिवस उलटले झाडांना आता फुले डोकावू लागली. त्याच समाधान वाटणार तेवढ्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुन्हा तेच... फवारण्या सुरू झाल्या २ ते ५ हजारांची अवषधे फवारली जाऊ लागली, स्वतःच्या मुलाची जितकी काळजी घ्यावी तितकी काळजी शेतऱ्यानी टोमॅटोची घेतली. रात्री जर पाऊस आला तर अनेक शेतकरी कुटुंब काळजी पोटी झोपत नसायची. करपा आला, कॅल्शिअम कमी झालं, अळइ आली, अनेक रोग आले पण तो खचला नाही. अगदी निसर्गाशी संघर्ष करून त्याने पीक उभ केलं आणि आज त्याच्या कष्टाला काय किंमत मिळतेय..???* 
*टोमॅटो २ रुपये प्रति किलो !!!*
*अरे लाज वाटुद्या माय बाप सरकार...😠😠 असच सुरू राहील तर शेतकऱ्यांच काही वाकड होणार नाही... अगदी वेळ पडली तर ते जमिनी विकून एका रात्रीत गाडी बंगला उभा करतील राहिलेल्या पैशाच्या व्याजात आरामात जगतील पण एक लक्षात ठेवा आम्ही जर शेती करणं सोडल ना तर तुम्हाला भाजी पासून दूध सुद्धा आयात करावं लागेल..!!!*

©Prasad Gite #indianfarmer
116728981ae5e2d309df4bfc5b0b5b7a

Prasad Gite

शिव चरित्र शिकवत, 
स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्यात कितीही मोठी लढाई हरलो, तरी काहीही फरक पडत नाही.
एके काळी पुरंदरच्या तहा अंतर्गत महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. परंतु ते खचले नाही किंव्हा थांबलेही नाही. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी ते २३ किल्ले तर परत मिळवलेच त्याच सोबत इतर किल्लेही मिळवत ३०० किल्ल्यांच स्वराज्य निर्माण केलं.
त्यामुळे आयुष्यात एखादी लढाई हरला म्हणून खचून जाऊ नका आपल्या पूर्वजांचा इतिहास आठवा नाही पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करा.

©Prasad Gite #inspirational
loader
Home
Explore
Events
Notification
Profile