Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5407205706
  • 3Stories
  • 85Followers
  • 46Love
    0Views

Gopal Hiwarkar

  • Popular
  • Latest
  • Video
2b6a8db9ac3da79e2ba78075ae9d1c9d

Gopal Hiwarkar

कुठं झालं लॉकडाऊन 
कुठं झालं क्वारंटाइन
काही फुगली खाऊन
अन काही उपाशी राहून

लोकडाऊन म्हणावं का
कि म्हणावं काऊंट डाऊन
काही उभे ठाकले सेवेत
काही मस्त खाऊन पिऊन

डाक्टर झालेत देवता
अन्न दाता ते देणारे
उपकार मानावे त्यांचे
का द्यावं आयुष्य सारे

लुटत आहेत मजा 
ती नागाची पिल्ले
कुठं पिठात नाही पाणी
कुठं उपाशी चिल्ले पिल्ले

व्याकुळ झालं जीवन
कुपोषित झालं पोरं
जस चाऱ्या वाचून
मरत उपाशी  ढोर
 (शब्दवात्सल्य..)

2b6a8db9ac3da79e2ba78075ae9d1c9d

Gopal Hiwarkar

भाऊ मनाची व्यथा

तिला सुखी बघण्या 
दृष्टी त्याची रे खिळली
लाडकी आहे त्याची
आता काळजी त्याला लागली

तिचा कासावीस जीव 
घरी पोटचा गोळा
दारात दुश्मन तिची
साथीला बसे ना आळा

तीच रोजचं झालं
तारेवरच अवघड जिणं
त्यानं सोसाव किती
माय बापा विना जिणं

असून पारखी झाली
लेकरासाठि ती माय
महामारीन सारली
जणू दुधावरची साय

भावाला बहिणीचं दुःख सोसवेना
मन हळ हळ ल त्याच 
त्याचा लागे ना जीव

भाऊ असतो पाठीराखा 
सल मनाला जडली
बहिणीसाठी भावाच्या 
आग पोटात उठली

ज्यांची केली होती पूजा
बंद आज ती देऊळ
झाकल्या डोळ्यान तेही
सोसताय हे सगळं
शब्दवात्सल्य......

2b6a8db9ac3da79e2ba78075ae9d1c9d

Gopal Hiwarkar

https://youtu.be/RIWHB6ZUjTU मराठी कविता, लेक

मराठी कविता, लेक


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile