Nojoto: Largest Storytelling Platform
ganesh5456612007615
  • 11Stories
  • 12Followers
  • 50Love
    33Views

Ganesh Bhad

Social Worker

www.manavvikasindia.co.in

  • Popular
  • Latest
  • Video
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत.
 
पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते...

©Ganesh Bhad #touchthesky
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परकं केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !"बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" च होता जणू माझ्यासाठी. माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद..!!

*तुमचाच स्नेही*
गणेश...😊

©Ganesh Bhad #Grassland
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परकं केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !"बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ या अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा"  माझ्यासाठी होता. माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो ! आपले असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद..!!

*तुमचाच स्नेही*
गणेश...😊

©Ganesh Bhad #still
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा..

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन 
ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत 
त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा 
ही शुभेच्छा....

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ 
आपल्याबाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत
 त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत 
ही शुभेच्छा...

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या 
गरीब गृहिणीला  मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून 
आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं 
ही शुभेच्छा..

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून 
सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं.. 
ही शुभेच्छा

इतरांची दिवाळी आनंदात जाओ म्हणून स्वतःच घरबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या ,
 जवान, पोलीस, वीज , वाहतूक , आरोग्य कर्मचारी 
यांच्या कुटुंबियांना बरोबर थोडातरी मोकळा वेळ मिळावा...
ही शुभेच्छा..

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा 
ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी 
ही शुभेच्छा..

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा
ही शुभेच्छा..

दरवर्षी आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून
 सरकारकडे विनवणी जाणाऱ्या जगाच्या पोशिंद्याच्या 
मालाला किमान हमीभाव मिळावा...
ही शुभेच्छा..

©Ganesh Bhad #Lights
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

एक दीप तेरे नाम का एक दीप उनके नाम का.. 



जो  देश की सरहदपर हमारी रक्षा कर रहें हैं..
जो खेती में हमारे लिए अनाज उगा रहें है
जो आज भी अस्पताल में सेवा कर रहें हैं
जो अस्पताल के बाहर किसीं अपने की, 
ठीक होनेकीं उम्मीद और दुवा कर रहा हैं..

और एक दीप उनके लिए जो ये दिवाली 
मनाने मे अक्षम (गरीब और बेवस) हैं..

©Ganesh Bhad #Diwali
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

स्वप्न माझं आणि तिचं

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न अनाथांचं पडावं
आणि अनाथांचा आसरा होण्यासाठी
 तिनं अनाथांची 'माय'व्हावं..

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न  स्त्री शिक्षणाचं पडावं, 
ग्रामीण स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी
कधी मी ज्योतीबा तर तिनं सावित्री व्हावं...

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न आदिवासी बांधवांचं पडावं
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
कधी मी प्रकाश तर तिनं मंदाकिनी व्हावं..

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना
स्वप्न मानवतेच पडावं
नेहमी समता, बंधुता आणि न्यायासाठी
कधी मी बाबासाहेब तर तिनं त्यागमूर्ती रमाई व्हावं..

©Ganesh Bhad #Texture
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

स्वप्न माझं आणि तिचं

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न अनाथांचं पडावं
आणि त्यांचा आसरा होण्यासाठी
 तिनं अनाथांची 'माय' व्हावं..

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न  स्त्री शिक्षणाचं पडावं, 
 स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी
कधी मी ज्योतीबा तर तिनं सावित्री व्हावं..

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना 
स्वप्न आदिवासी बांधवांचं पडावं
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
कधी मी प्रकाश तर तिनं मंदाकिनी व्हावं..

माझ्या आणि तिच्या डोळ्यांना
स्वप्न मानवतेच पडावं
नेहमी समता, बंधुता आणि न्यायासाठी
कधी मी बाबासाहेब तर तिनं त्यागमूर्ती रमाई व्हावं..
                                      - गणेश भड

©Ganesh Bhad #Texture
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

आयुष्य माझं आणि तुझं 

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना 
स्वप्न  स्त्री शिक्षणाचं पडावं, 
ग्रामीण स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी
कधी मी ज्योतीबा तर तू सावित्री व्हावं.

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना 
स्वप्न आदिवासी बांधवांचं पडावं
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
कधी मी प्रकाश तर तू मंदाकिनी व्हावं

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना 
स्वप्न अनाथांचं पडावं
आणि त्यांचा आसरा होण्यासाठी
कधी तू सिंधुताई तर मी तिचा सहकारी व्हावं

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना
स्वप्न मानवतेच पडावं
नेहमी समता, बंधुता आणि न्यायासाठी
कधी मी बाबासाहेब तर तू त्यागमूर्ती रमा व्हावं..
- मी आणि तू

©Ganesh Bhad #Texture
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

आयुष्य माझं आणि तुझं 

माझ्या आणि तुझं डोळ्यांना 
स्वप्न  स्त्री शिक्षणाचं पडावं, 
ग्रामीण स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी
कधी मी ज्योतीबा तर तू सावित्री व्हावं.

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना 
स्वप्न आदिवासी बांधवांचं पडावं
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
कधी मी प्रकाश तर तू मंदाकिनी व्हावं

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना 
स्वप्न अनाथांचं पडावं
आणि त्यांचा आसरा होण्यासाठी
कधी तू सिंधुताई तर मी तिचा सहकारी व्हावं

माझ्या आणि तुझ्या डोळ्यांना
स्वप्न मानवतेच पडावं
नेहमी समता, बंधुता आणि न्यायासाठी
कधी मी बाबासाहेब तर तू त्यागमूर्ती रमा व्हावं..
- मी आणि तू

©Ganesh Bhad #withyou
2d3b58e43bfe78c600038d3dfc98ccef

Ganesh Bhad

रचनात्मक विचार मालिका
भाग-1 
@गणेश भड 

 विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही..... 
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही 

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
                 कवी-सुरेश भट

©Ganesh #worldpostday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile