Nojoto: Largest Storytelling Platform
dipalikhadke9284
  • 47Stories
  • 22Followers
  • 470Love
    0Views

bhakti

  • Popular
  • Latest
  • Video
2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

तो आला...
सुखबधीर संवेदनांचा बहर घेऊन...
संवेदना...सुखाच्या ...संवादांच्या...कधीही बाहेर फुटू पाहणार्‍या उमाळ्यांच्या...!!
आणि त्या दुःखद उमाळ्यांना हळुवार लपेटून घेणारा तो...तिला उगाच उबदार वाटला.
तिच्या डोळ्यात वेदनांची गावं बघून तो हिरमुसला..
तिच्या त्या गावांच्या प्रवासांची वर्णन ऐकून शहारत राहीला....
तिला उगाच ग्रेटग्रेट समजत राहीला....
पण ऐक ना....
त्या वेदनांच्या गावांची क्षितिजरेषा  तुझ्या रूपात भेटेल कधीतरी 
हा विश्वास होताच तिला. ...
तुला सांगू का?
आता सुखाला जाग आलीय...
जगण्यालाही भान आलंय...
दुःखाने विजनवास  संपवलाय
आणि प्रेममयी प्रभात
उगवू बघतेय...

प्रिय.....
तु...तो तेजोनिधी आहेस माझ्यासाठी

समजतंय का तुला???

दीप..!!

©Dipali khadke

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

सप्तपदी

साजणासंगे सात पावले
सप्तपदी त्या सौख्य दडले

पहिले पाऊल, कर्तव्याची देई चाहूल
ठाम उभी राहून तिथे, जबाबदारी स्विकारीते

दुसरे पाऊल, जाणिव देईल
ही जाणिव माणुसकीची, "माणूसपण" मी वेची

तिसरे पाऊल, गंमत देईल
ही गंमत जोडीची, माझ्या-'त्यांच्या' प्रितीची

चवथे पाऊल, माहेर आठवेल
मनात साठवीन माहेर, तोच माहेरचा आहेर

पाचवे पाऊल, जाणून घेईल
सासुरवाडचे मोल, सासर माझे अनमोल

सहावे पाऊल, इतिहास घडवील
लेक इथली लाडकी, सून तिथली होईल

सातवे पाऊल ,दर्शन मजला देईल
गणगोतासह दोघांचा, संसार सुखाचा होईल

©महेश दुर्वे
  १.१२.२०२०
2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

धागे राहीले होते काही उसवलेले
आज तोडून त्याने स्वतःला मोकळे केले 

कितिदा जोडले..सांधले जीव तोडोनी मी
तरीही काही कमी ते राहीले

किती हट्ट केला उजळण्याचा पुन्हा
अंधारले सारे पुन्हा ना पेटले

रंग गेले फुलांचे सुकले देठ ही
मग विरले...कोमेजूनी गळाले

उगा चालते वाट बोचणार्‍या तणांची
रक्ताळले पाय तरीही ना थांबले

दीप...!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

वो गैरों की बाहों मे सोते है

और नाम वफा का लेते है

वल्लाह....

वो बेवफाई भी बडे 

चाव से निभाते है...!!

दीप..!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

आपण दूर झालो त्या वळणावर
मी अधून मधून जात असते
कुठेतरी आठवणींची चिन्हं दिसतील
 म्हणून उगाच त्या वळणाला निरखत असते
त्यानंतर अनेक वाटा चालले
अडखळले नाही ...पडले नाही
आपल्या  त्या वळणावर मात्र..
नेहमी घसरायला व्हायचं मला
....आता कळतोय रे...
सरळसोट रस्त्यातला आणि वळणातला फरक...
वाटा नेहमी सरळ...आणि वळणं???
वळणं नेहमीच वक्राकार असतात...!!
मागं राहून गेलेल्या कित्येक क्षणांची 
गुंतवळ जपून ठेवतात ती
म्हणूनच..वळणावर माणसं नेहमी हरवतात बघ...
की गुंततात तिथेच...??
दीप...!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

शेवटी क्षितिज दिसले म्हणूनी
उरी फुटूनी धावता
अंततः कळले मला की
भास सारा आपुला

नाही कसली खंत आता
ना ही कसली ही व्यथा
गल्बला मनीचा फुकाचा
श्वास ही बघ निवर्तला...

हे स्वप्न काळजाचे बघ.....

दीप..!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

आभाळ अगदी भरून आलंय
पण फक्त गडगडतंय
मोकळं व्हायला मिळाली नसेल  का 
कुशी त्याला???

बिच्चारं...म्हणूनच सैरावैरा धावतंय

 दीप...!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

श्वास गुंततो आधी
मग जीव गुंफला जातो



तुझ्या माझ्या प्रीतीचा
जन्म असा बघ होतो...
दीप..!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

तेरी यादों की नमीं है
    वर्ना
ये जिंदगी बरफ जैसी थमीं है!
      शुक्र है
बिजलियाँ गिराती है तेरी याँदे
      वर्ना
बारीशों मे भी विरानी है!!
          दीप..!!

2fe4c00a983dbf95407743bae7a83f76

bhakti

रंग उडालेल्या तिच्या हातची
मेंदी मात्र खुप रंगते



तो अजूनी तळहातावर राहतो
त्या वेडीला ते कुठे कळते...

दीप..!!

loader
Home
Explore
Events
Notification
Profile