Nojoto: Largest Storytelling Platform
archanapol5687
  • 26Stories
  • 4Followers
  • 219Love
    674Views

Archana Pol

  • Popular
  • Latest
  • Video
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

शब्दावाचुन कळले सारे
  प्रेमरंग ते व्याकुळले
भाव बोलके झाले सारे 
नजरेमधुनी बघताना

आठवते का तुला सख्या रे
 कविता ओली स्फुरताना
सांज धुनीचे  क्षण आठवले 
आज झुल्यावर झुलताना

©Archana Pol #togetherforever #सांजधून
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

असं म्हणतात,
 ज्या ठिकाणी अपमान होतो 
अशा ठिकाणी क्षणभरही राहू नये.. 
 स्त्रीला आयुष्यभर तिथेच रहावं लागतं.. 
 ज्या  ठिकाणी ती वारंवार अपमानित होते..

©Archana Pol विचार
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

गुरु भवतारक जगदोद्धारक गुरु तेजस्वी अखंड पावक.
गुरु सुखकारक दुःखनिवारक गुरु उपदेशक अविचल साधक. 
गुरु बोधामृत, गुरु परिवर्तक, गुरु निष्ठेचा विनम्र पालक.
गुरु तेजस्वी, गुरु परमार्थक, उद्बोधक अन्
जीवनदायक. 

गुरु अभ्यासक, विश्वसुधारक , गुरु उर्जेचा अखंड प्रेरक.
वात्सल्याचे मुर्तीरुप गुरु, गुरू नभीचा शीतल स्त्रावक.
गुरु अधिनायक, विघ्नविनाषक, गुरु ओजस्वी पायसदायक.
गुरु ज्ञानामृत, अथांग सागर, जिज्ञासू अन्  शांत निरूपक.

गुरू प्रेरणा, गुरू चेतना, गुरूबळाची नित्य 
कामना.
गुरू दर्शने विरे वासना लाभते मना शांत चेतना.
गुरू दाविती मार्ग शुभंकर गुरुमंत्राचे अखंड चिंतन.
गुरुमाऊली द्यावी सद्गति स्वामी भुपती
हीच प्रार्थना.

©Archana Pol गुरुवंदना

गुरुवंदना #मराठीकविता

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

भेटीसाठी डोळी | ओथंबले घन |
मनात श्रावण | पेरलेला  ||१||

आतुरले मन | पाहताना वाट | 
भिजलेला काठ | मनाचा रे ||२||

श्वासांचा आवेग | उसासला जीव |
लागे ना रे ठाव | काळजाचा ||३||

बरसल्या धारा | गंधाळली माती |
शहारली पाती | चिंब ओली ||४||

गंधाळ गंधाळ | माळरान सारे |
मखमली वारे | भोवताली ||५||

तरारली राने | चिंब ओली मने |
रुजलेले गाणे | रानी वनी ||६||

अंकुरला कोंब | धरित्रीच्या पोटी |
मोहरली सृष्टी | आनंदाने ||७||

पालव स्पर्शाने | आनंदी अंगण |
नभाचे हे ऋण | कसे फेडू? ||८||

©Archana Pol #ऋण
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

उगा शब्दांना घोळवू नकोस चॉकलेटमध्ये 
तुझ्या प्रेमाचा गोडवा जपलाय मी ह्रदयात..

अर्चू..

©Archana Pol #Happychocolateday
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

' आई' नावाचा चार्जर..





काही व्यक्ती आपल्यासाठी चार्जरसारख्या असतात..  जेव्हा बॅटरी डाऊन होते. मनामध्ये काहीतरी बिघाड झालाय हे जाणवतं..  आतून तुटून पडल्यासारखं वाटतं.‌. आभाळात झेप घ्यायचीय पण उमेद खचलीय हे जाणवतं.. निगेटिव्हिटीचा व्हायरस वाऱ्यासारखा उधळत असतो.. अनावश्यक ऍप्सचा भरणा झालाय आणि आता सगळं काही हॅंग होणार असं वाटतं.. तेव्हा तेव्हा.. हा चार्जर  अगदी विश्वासानं धावत येतो.. अगदी न बोलवता..

याला नेटपॅकची गरज ना इलेक्ट्रिसिटीची.. या चार्जरची स्वतःचीच पॉवर कॅपॅसिटी प्रचंड आहे..  अगदी हार्ट टू हार्ट कनेक्ट होतो..  सगळ्या निगेटिव्हिटीचा व्हायरस निघून जातो आणि मनाचा फोन अगदी क्लीन होतो..  सगळे कॉन्टॅक्ट क्लिअर होतात, जे नको ते डिलीट होतं..  आपल्याला हवी ती पिक्चर्स पुन्हा एकदा स्वच्छ दिसायला लागतात.. आणि बॅटरी फुल्लचा मेसेज चेहऱ्यावर झळकू लागतो. 

क्यु आर स्कॅन करुन हल्ली सगळं ऑनलाईन मिळतं..  पण स्कॅन करुन आई नाही मिळत.! बाकी सगळं ऑनलाईन मिळेल पण ती आणि तीचं प्रेम ऑनलाईन नाही मिळणार..   ज्याच्याजवळ हा चार्जर आहे त्यांनी जीवापाड सांभाळा हं हा चार्जर.. एकदा हरवला ना.. की करोडो देऊनही नाही मिळणार परत.. 

तुमच्याकडे आहे का असा लाईफटाईम चार्जर??

©Archana Pol
  चार्जर

चार्जर #जीवनअनुभव

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

आतुरल्या रानवाटा
आतुरली रानफुले
आभाळाच्या अंगणात
ढग खेळतील झुले

झिम्मा फुगडी वीजांची
वारा घालेल धिंगाणा
गोल गिरक्या धुळीच्या
नभी पाचोळा भणाणा

झाडामाडांच्या झावळ्या
विस्कटेल सारं काही
सर झिम्मड येईल
तलखीची त्राही त्राही

गाणे सान थेंबुल्यांचे
सर नर्तन करेल
गंध भरल्या मातीत
बीज कोवळे रुजेल.


चिंब सरींचा वर्षाव
धरा धुंद मोहरेल
कणाकणात सृष्टीच्या
रंग प्रीतीचा खुलेल.

रुजवेल नवे काही
दिशादिशांत मोकळ्या
उगवेल कविताही
मना मनात कोवळ्या..

©Archana Pol आतुरल्या रानवाटा

आतुरल्या रानवाटा

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

चालत आहे आयुष्याच्या सोबत सोबत..
हिशोब चुकला कसा कधी पण कळले नाही..

©Archana Pol हिशोब

#sadquotes
430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

आयुष्याने कधी रांगडे कधी मखमली व्हावे..
चाखत गोडी संसाराची स्वप्नांसोबत गावे..
विभ्रम थोडे थोडी गंमत थोडी छेडाछेडी
प्रेमालाही रंगत येते सोबत असता खोडी..

नको सारखी गुळमट गोडी हवाच थोडा झटका 
रंगत येते संसाराला उडता थोडा खटका
रंग बिलोरी आयुष्याचे समजून घ्यावे थोडे.
भाव मनीचे जाणुन घ्यावे सुटेल अवघड कोडे.

संसाराचे रूप खुलवते विरह भावना थोडी.
लुटूपुटीचे हवेच भांडण लटकी लाडीगोडी.
झणझणीत कधी, कधी गोड तर कधी लागते स्टार्टर..
मिळमिळीतशा जगण्यालाही हवी वाटते क्वॉर्टर..

लुटूपुटीच्या संसाराला हवी माणसे थोडी..
थोडी नटखट, चविष्ट आंबट, थोडी साखर गोडी.
खट्याळ काही, अतरंगी अन् काही कडवट थोडी
गहिवरल्या डोळ्यात पाझरे चांदणमाया वेडी.  

आयुष्याच्या वाटेवरती सुख दुःखाची सोबत.
आपुलकीच्या नात्यांसोबत आयुष्याला रंगत.
सखेसोबती, सगेसोयरे हळव्या गाठी भेटी.
आनंदाने ओंजळ भरती काळजातली नाती.

©Archana Pol काळजातली नाती
#HEARTSBOKEH

काळजातली नाती #HEARTSBOKEH #मराठीकविता

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

रंग सारे फिकूटले..
लोपल्या साऱ्या खूणा..
शोधते मी अंतरी..
गोठलेल्या भावना..

अर्चू..

©Archana Pol #वेदना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile