Nojoto: Largest Storytelling Platform
pallaviphadnis7486
  • 519Stories
  • 358Followers
  • 3.9KLove
    6.1KViews

Pallavi Phadnis

poet and writer

  • Popular
  • Latest
  • Video
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

विकास ,धर्म ,देव ,देश ,
संस्काररूपी कमळात 🏹 धर्मरक्षणासाठी धनुष्य घेत
 मतरुपी बाण घेऊन 
अधर्मी,गुलाम,अविचारी 
लोकांशी लढण्याची 
हीच ती वेळ ⏰

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

हीच ती वेळ⏰अखंड हिंदुत्वासाठी शिवधनुष्य हाती घेऊन🏹दशहतवादाच्या चिखलातून ,विकास ,गती ,देव, देश,धर्म ,अखंड हिंदुत्वाचे कमळ फुलविण्याची

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White वर्षानुवर्षं उतरविण्या सत्तेचा माज,
जनतेने व्हावे ,अज
घेऊनी हाती सत्तेचा धर्मध्वज ,लोळवावे
मस्तवाल गज 

अज- म्हणजे ब्रह्मा, भाग्यविधाता 
         पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis #ramnavmi
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

ज्यावेळी बदल
 निरपेक्ष हवा असतो , 
धर्म,राष्ट्र रक्षणासाठी 
अहंकार,मत्सर, द्वेष
 बाजूला ठेवून,
मतभेद असले तरी 
मनभेद न ठेवता
 एकत्र येणे गरजेचे असते

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

दारी सडा रांगोळी,
दिव्यांच्या ओळी, 
गोधन,धनधान्य पूजावे
 दीर्घायुष्यासवे ,व्हावे
 लक्ष्मीचे आगमन, 
लक्ष्मीनारायणाचे व्हावे 
अतूट बंधन,बंधुभगिनीचे
 नाते जपता व्हावे
 शुभ दीपावली आगमन
        पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

महाराज आपल्या घरात होऊ शकत नाही कारण,जिजामाता ,राणीलक्ष्मीबाई शिक्षण देऊ शकतो 
पण प्रत्यक्ष समाजात वावरताना तिला ,
अबला म्हणूनच पाहिले जाते ,आणि 
ह्यातून फक्त अधर्मी ,फितूर पिढीच घडते ,
कटू आहे पण सत्य आहे

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

पुरुषाला आधुनिक स्त्रीच आवडते असे नाही ,ते पाहायचे असेल तर देवीचा सुंदर मनमोहक शृंगार करताना त्याला पाहिले की वाटते ,पुरुषाला स्त्री ही देवीच्या रूपातच जास्त आवडते

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White सत्य,संस्कार ,धर्म ,देशप्रेम हे जे चांगले आहे ते लोकांना दाखवा वाईट दाखवले की लोक तुम्हाला विरोधी समजतात जेंव्हा खरेच लोकांसमोर येईल त्यावेळी त्यांना वाईट काय आहे समजेल पण हे समजण्यासाठी बुद्धी हवी आणि त्यासाठी वरील संस्कार ,कर्म ,नीतिमत्ता चांगली हवी

©Pallavi Phadnis #GoodMorning
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White अपमान अशी गोष्ट आहे जो ,जीव द्यायला किंवा घ्यायला भाग पाडतो, नाही तर मग चाणक्य होवून बुद्धीबळाच्या पटलावर सगळा डाव पलटून टाकतो

 पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis #International_Chess_Day
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

अवखळ अल्लड पाऊस कित्ती 
प्रेमळ असतो ,येताना कसे
स्पंदनांचे ढग दाटून येतात
स्पर्शाचा उबऱ्याने सैल होतात

सैलावलेल्या थेंबांना काही 
बंधनेच नसतात ,उगाच बेफाम
होवून अंगणात नाचतात,थेंब न
कळत थकून धरणीतरंगाला भेटतात

काही लबाड थेंब कधी अळवावर
कधी फुलावर कधी कळीवर डोलतात
काही थेंब तर त्या लाजूळवर भाळतात
ते  बुजरेपान अलगद लाजून पर्णपदरात लपतात

असा अल्लड अवखळ पाऊस
कधी उनाड ,बेफाम ,कधी लाजरा
असतो ,पण काय बोलावे आता 
ह्याच्या येण्यानेच तरंगसाजन भेटतो

       पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
  #Droplet
loader
Home
Explore
Events
Notification
Profile