Nojoto: Largest Storytelling Platform
viratpatil7021
  • 11Stories
  • 6Followers
  • 114Love
    0Views

शब्दवेडा किशोर

  • Popular
  • Latest
  • Video
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White आता थोडे बोलू काही....
शब्दवेडा किशोर 
उद्या कुठे मुक्काम असेल नाही माहित 
रात्र अजुनही बाकी आहे
आता थोडे बोलू काही         ll१ll
जीवन कठीण गाणे
सूर जरासे जुळले आहेत 
दूरवर चालायचे तर आहे 
आता थोडे बोलू काही        ll२ll
रिमझिम पाऊस येतो आहे
गारव्यात शेकोटी पेटली आहे 
आता थोडे बोलू काही        ll३ll
वळण अजून दूर आहे
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते 
आता थोडे बोलू काही         ll४ll
वाटते सुख दुःखात साथीदार असावा
जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी
म्हणून आपण आता थोडे बोलू काही        ll५ll

©शब्दवेडा किशोर #sad_quotes  लाईफ कोट्स

#sad_quotes लाईफ कोट्स #मराठीविचार

6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White  आयुष्यात सोबत आपलं कुणी
जोवर आहे तोवर
त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. 
त्याच्याशी बोला..
त्याला ओळखायला शिका..
त्याला जपा..
त्याला जगवा..
व लढायला शिका व शिकवा 
कारण 
मावळतीआड गेलेला सूर्य
अन् मातीआड गेलेली नाती
पुन्हा नशिबी मिळत नाही......
*शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #जीवन प्रवास  माझे विचार

#जीवन प्रवास माझे विचार #मराठीविचार

6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #नवा जन्म घेण्या..
शब्दवेडा किशोर 
आहे सुखात सारे इतकेच बास आहे
सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे 
धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे
अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे  ll१ll
पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी
अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे 
टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे
तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे
दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला
बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे  ll२ll
कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ?
पडती कमी कुणाला चोवीस तास आहे
गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो
शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे
काही नसूनसुद्धा मौजेत कुणी
अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll
असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे
सदा स्वतः शापित राहुनिया
इतरांचे घरं मी भरवलेले आहे
इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास
सतत मी रितेच ठेवले आहे 
आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या
मी पुन्हा देवाकडे जात आहे                    ll४ll

©शब्दवेडा किशोर #Sad_Status  लाईफ कोट्स
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल....
शब्दवेडा किशोर 
होईन भिकारी मी पंढरीचा वारकरी
वारी चुकू न दे तू हरी
छंद लागला मज त्या श्रीहरी विठ्ठलभक्तीचा 
जन्मोजन्मी दास होईल त्या श्रीहरी विठ्ठलाचा   ||१||
माझ्या विठोबाचा कैसा हा प्रेमभाव
खोट्या भक्तीस नसे तया चरणी वाव
माझ्या विठोबाचे रूप ते खुप साजीरे
तयामुळे लाभती आम्हास सप्तरंग हे आयुष्याचे गोजीरे  ||२||
नाही सोडणार कदापी कधी मी तयाचे चरण
तयाचरणी विरुनी जाता होईल माझ्या जन्माचं सोनं
तयाकृपेमुळेच आहे मजजवळी हे माझ्या श्वासाचं धन
तयाच्या दर्शनमात्रे होतसे मन माझे सदा पावन  ||३||
जन्म दिलासी आम्हा तु आमच्या बा विठ्ठला
तूच आमचा असशी पाठीराखा 
तूच आमचा बंधू सखा गुरु अन् धर्म 
अंतसमयीदेखील तुझ्याच चरणी दे विसावा तु आम्हाला   ||४||

©शब्दवेडा किशोर #vitthalbhakti  मराठी कविता

#vitthalbhakti मराठी कविता #मराठीकविता

6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #क्षण हे साजिरे 
शब्दवेडा किशोर
एका क्षणात कैक क्षणांच्या आठवणींचे पसारे होतात
झालेले ते क्षणांचे पसारे सावराया
आपल्या संगे क्षणातंच पून्हा नवे क्षण येतात
मग आपसुक हे नवे क्षण आपणास जुन्या त्या गोडकटू क्षणांचा
क्षणचित्रमय पसारा एका क्षणातंच आपल्या
क्षणभंगूर मनाला आठवायला लावतात
जुन्या गोडकडू क्षण पसाऱ्याला
आठवताना मग आपसुकच आपले ते नवे क्षण जणू क्षणातंच
क्षणाचे सुवर्णमय रूप धारण करतात

©शब्दवेडा किशोर #Sad_Status  जीवन प्रवास
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #निरोप घेतो जगा....
शब्दवेडा किशोर 
निरोप घेतो जगा आता आज्ञा असावी
चुकले हुकले काही माझे त्याची क्षमा असावी......
वेळ भरली माझी आता माझा अंतःकाळ जवळ आला
हसतच मज न्याया बघा तो काळ दारी उभा राहीला......
आजवर खुप छळले मी तुम्हा सर्वांना
मेल्यावरही शाप देऊ नका माझ्या आत्माला ही विनंती तुम्हाला......
शेवट माझा गोड व्हावा ही इच्छा तुम्ही धरा
नवा जन्म मज चांगला मिळो ही देवास कामना करा......
या जन्मी तुम्हा कुणासच मी सुख नाही कधी दिले
हे कर्ज आहे सदा माझ्या डोई
घेईन नवा जन्म फेडेन तुमचं कर्ज होईन त्यातून उतराई......
शापीत हा जन्म गेला त्याचा राग नाही मला
घेऊनी नवा जन्म फेडण्या तुमचे कर्ज
तो सर्वसुखे जगण्याचा ध्यास जिवासी लागला......

©शब्दवेडा किशोर #sad_shayari  जीवन प्रवास
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

#अंतरीची खुण
शब्दवेडा किशोर 
अंतरीची खुण अंतरीची जाण
अंतरीचा घाव अंतरास ठावं
ऐलतीर नौका पैलतीर गावं
भवसागर पार एकचि सार
अंतरी देवासी भजा सांज सकाळ 
मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत
अन् होईल सफल-सुफळ अंत

©शब्दवेडा किशोर #walkingalone  जीवन प्रवास
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #वक्त...
@शब्दभेदी किशोर 
वक्त से जालिम कोई बला नहीं हैं
वक्त से बेहतर कोई सलाह नहीं हैं
वक्त ही हैं मरहम और वक्त ही सिला हैं
वक्त से रहबर कोई दुवाँ नहीं हैं
वक्त हर जख्म को भर देता हैं
वक्त से बेहतर कोई दवा ही नहीं हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......
किसीका अच्छा चलता हैं तो
किसीको काटना पडता हैं
किसीको बिन मांगे मिलता हैं तो
किसीको मांगना पड़ता हैं
किसीका बितता हैं तो
किसीको बिताना पडता हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......

©शब्दवेडा किशोर #वक्त_और_जिन्दगी  माझ्या लेखणीतून
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #विघ्नहर्ता श्रीगणेश
शब्दवेडा किशोर 
गणरायाची ओढ किती गोड गोड
त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड 
जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता
सखा बंधू गुरु तोची मातापिता
त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ
तोचि क्षणात नाहीसा करतो
माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ 
गजानना गणराया असा चाले गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन्
पावन होई मग जन्म हा आमचा 
सोडव आमचा अहंकार
वाचव तु आमचा संसार
दे नवं बळ आम्हा जगण्या
आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार 
तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया
आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पावसाळे येऊनिया गेले
भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेल कारण
पाऊस सोडून त्याला कुणीच पाहिलं नाही
तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं अन् मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच
रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कितीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर
मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातचं काहीच न राखता थेट
सर्वांच्या काळजाला जाऊन भिडणं 
त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात जुन्या साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती
कधी आठवतो वाफाळलेला चहा तर
कधी आठवतं सोबत असलेलं ते कवितेचं पुस्तक
तर कधी आठवतं ते नुसतं बसून त्याला न्याहाळलेलं एकटक
कधी आठवते गरम भजी वडा अन् मित्रांसोबत केलेली ती धमाल
तर कधी आठवतं गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल
कधी आठवते उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री
कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळं काढून बघण्याचे
काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच की हिवाळे अन् उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातंच ना मी पाहीलेत इतके पावसाळे

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile