Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilhuddar9772
  • 959Stories
  • 14Followers
  • 9.6KLove
    1.1KViews

Swapnil Huddar

  • Popular
  • Latest
  • Video
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

मिठीत घेतलेस तू अन् माझ्यात भिनले तुझे अत्तर,
आईने विचारल्यास मी, काय द्यावे नेमके उत्तर ?

आता खोलीत सर्वत्र बघ, तुझे अत्तर गंधाळते आहे,
निघून गेलीस तू तरी, मिठीत अजून रेंगाळते आहे...

तुझे असे भेटणे म्हणजे, मी मलाच विसरून जाणे,
दुःख, यातना, घाव सारे, एका स्पर्शात ओसरून जाणे...

तुझ्या मनी आघात किती, सोसवेना तुझ्या नयनांना भार,
माझ्या वाट्याला पाठवतेस का, जमले तर अश्रू चार...

डोळ्यांत पाहिल्यावर जाणवली, ओल जुनी विरहाची,
पुन्हा ठरली आहेच ना, भेट आपली परवाची...

पुढल्या भेटीत टाळ मिठी, हाती हात बेहत्तर,
आईने विचारल्यास मी, काय द्यावे नेमके उत्तर ?

स्वप्नील हुद्दार







.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

कोंडून घेतले होते त्याने एका खोलीत स्वतःला,
यंदा ही दिवाळीला तो घरी जाऊ शकला नाही बिचारा…

स्वप्नील हुद्दार 
















.

©Swapnil Huddar #Diwali
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता,
‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता…

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar #Diwali
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

तो वर्षानुवर्ष या आशेवर की मिळेल साथ तिची,
या दिवाळीत मिळेल का पणतीला वात तिची?

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar #Diwali
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

तिच्या असण्याने जणू  दिवाळी आहे माझ्या घरी,
एक लेक देवाने द्यावी प्रत्येकाच्या पदरी…

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar #Diwali
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

एका पणतीची वात जणू रात्रभर तेवत होती,
बाबासाठी एक पणती आई दारात ठेवत होती...

स्वप्नील हुद्दार














.

©Swapnil Huddar #Diwali
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White कळत नाही काय करावे, तू अशी रुसल्यावर,
जवळ कसे घेऊ तुला, तू जवळ नसल्यावर...

येईल आसू नयनी जर, खुशाल येऊदे की,
हसायचे असते पुढे तर रडून घ्यावे खचल्यावर...

दिवस सरला बघ असा, तुझ्या अबोल्यात अख्खा,
कधी जाईल रुसवा, रात्र अख्खी सरल्यावर??

मला ठाव आहे सखे, हसू आणायचे कुठून,
खुलतो ना चेहरा तुझा, नभी चंद्र दिसल्यावर...

असं तृप्त होऊन जावं तरी हट्ट शेवटी धरावास,
"तू ही पहावं चंद्राला तिथे, मी पहात बसल्यावर..."

आज मनसोक्त पाहून घे, पूर्ण चंद्राला तिथे तू
"मला चंद्र हवा कशाला, तुझा फोटो असल्यावर..."

स्वप्नील हुद्दार















.

©Swapnil Huddar #moon_day
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

जसं तुला त्याचं असताना, माझं होणं जमलं नाही,
तसंच तू त्याची झाल्यावर, तुझ्यात मन रमलं नाही...

तू कसं म्हणतेस तुला तुझ्या शहराने फक्तं प्रेम दिलं,
एक एक जागा सांगत होती, माझ्याविन तुला करमलं नाही...

एक हृदय होतं अन् ते ही आजन्म तुला दिलं मी,
इतक्या वर्षांत जे कुणापुढे कधी नमलं नाही...

मी आतून इतका अशांत या आधी कधी नव्हतो गं,
मला विसरशील कसं, हे वादळ अजून शमलं नाही...

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar #GoodNight
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

माझ्या कादंबरीत तो एकंच पात्र,
त्याच्या कहाणीत मी एखादी मात्र...

स्वप्नील हुद्दार 














.

©Swapnil Huddar #kinaara
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

वाट्याला आलेला विरह, हसत हसत पचवून नेता येतं,
कवी फसवतो कुठे, कवीला फक्त लिहिता येतं...

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar #navratri
loader
Home
Explore
Events
Notification
Profile