Nojoto: Largest Storytelling Platform
meenakshigoranti8353
  • 55Stories
  • 94Followers
  • 519Love
    14.3KViews

Meenakshi Gorantiwar

  • Popular
  • Latest
  • Video
92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

*मात्रावृत -अनलज्वाला*

नदी किनारी

नदी किनारी हळू उतरली सांज सावळी
डोह तळाशी जणू अचानक खळबळ झाली
संध्याराणी तिथेच घुटमळ , घुटमळ झाली
अवचित बाई अंगोपांगी  सळसळ झाली

  बघ  प्रतिक्षेत  या जीवाची वणवण झाली 
तू भेटताच आठवणींची  रुणझुण झाली
गतकाळाच्या गोड गुलाबी स्मृती उजळल्या
हृदयामध्ये पुन्हा जराशी किणकिण झाली

पाण्यावरती संध्याछाया पहुडत गेली
तरंगातुनी हलकी हलकी थरथर झाली
क्षितिजावरती केशर तांबुस रंग विखुरले
अथांग डोही एकाएकी सरसर झाली

जलात पडता रविराजाचे बिंब रुपेरी
बिलगुन घेते घट्ट उराशी सांज बावरी
 काठावरचे मौन भंगता भाव उमलले
 विरहामध्ये केविलवाणी सांज लाजरी

निरोप देता सलते काही दोघांनाही
 जाता जाता आर्जव उरतो नदी किनारी
 दिल्या घेतल्या आणाभाका स्मरून येता
क्षणमोराचे फुलून येती नदी किनारी


मीनाक्षी गोरंटीवार..

©Meenakshi Gorantiwar #womensday2021
92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

वृत्त: वनहरिणी 
........
सोहळा
गगन भासते  गाभुळलेले मावळतीच्या रंगांमध्ये 
 हलके हलके  सरकत जाते सांज सावळी तिमिरामध्ये  
 उदासवाणी गात विराणी नभी विहरते एक पाखरू
 आसुसलेले  क्षितिज गहिवरे धरतीसाठी मौनामध्ये 

कातरवेळी  संध्यासमयी  नयनी  माझ्या  झरते पाणी
तुझी आठवण  उधळत येते  गंध माखुनी वाऱ्यावरती
अवचित वेडी हुरहुर लावी सांज गुलाबी हृदयामध्ये
तुज स्मरतांना  असेच होते  चित्त न राही थाऱ्यावरती

दिवे लागता डोह तळाशी  घुटमळ होते उगा मनाची
सैरभैरते  मन पातीचे कधी  कळवळे देठ मनाचे
सांज सावल्या लांबलचक त्या बिलगत जाता अंगोपांगी
काळजातल्या  कप्प्यामधले  उगा वाजती  ढोल मनाचे

डोळे मिटता  उठता बसता  भास घुटमळे   सभोवताली
  खोल खोल सय भरून येता आठव उमलत जातो सारा 
 तुझ्या सवे ही लाजुन खुलते  प्रिया बावरी स्वप्नामध्ये
बहरत जाते  प्रीत आपुली समीप असता  तुझा पसारा

मीनाक्षी गोरंटीवार

©Meenakshi Gorantiwar #Morning
92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

पहाट

पहाट वेळी दिशा रंगुनी केशर  झाल्या वाटे
उधळुनी रंग प्राची आली मोद अंतरी दाटे
बांग देउनी म्हणे कोंबडा चला उठा हो सारे
झुळझुळ वाहे  मंदमंद ते गार सुगंधी  वारे

धुंद मोगरा वाऱ्यावरती  दरवळ पेरत  जातो
 रानोमाळी  कुहूकुहू ती कोकिळ गाणी गातो
सडा घातला  प्राजक्ताने फुला फुलांचा  दारी
हळूहळू ती नभी अवतरे सूर्याची हो  स्वारी

नील अंबरी मुक्त विहरती स्वैरपणाने पक्षी
दयाघनाने  पंखावरती गोड रेखली   नक्षी
रविकिरणांची उन्हे कोवळी धरणी अंगी ल्याली
दव भिजलेली पहाटओली हळूच वितळत गेली

 दारी आली पहाट हसरी कुमकुम शोभे भाळी
दूर मंदिरी शंख नाद तो भक्त वाजवी टाळी
नवथर गाणे दिशा दिशांना उषा गाउनी  गेली
आयुष्याला चैतन्याची नवी पालवी  आली


मीनाक्षी गोरंटीवार वणी...

©Meenakshi Gorantiwar #bye2020
92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

फुलाफुलांचे भाग्य वेगळे  उमगत नाही कोणाला

काही सजती शय्येवरती काही ईश्वर चरणांशी

मीनाक्षी गोरंटीवार

©Meenakshi Gorantiwar

92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

मीनाक्षी गोरंटीवार

सर
डोळ्यात थांबले
सर आसवांचे
घाव हृदयाचे
हुळहुळे

सर आठवांची
चिंबित करते
तुला न कळते
भाव ओले

घन अंधारले
ते सावळ काळे
वाजवित चाळे
घनु वाहे

त्या क्षितिजावरी
गोंदन केशरी
कडा जरतारी
लकाकती

डोह अंतरात
मन कुठे शांत!
तहान  उरात
व्याकुळते

92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

#SADFLUTE
92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

ठेवा
मी सोडून आले माघे
गतस्मृतिंचा ठेवा
शब्द चाळताना
दिसतील माझ्या
खाणाखुणा
थोड्या जखमाही
भळभळणाऱ्या
देणे घेणे श्वासाचे
फुलने, फुलून येणे
रोज रोज शब्दांचे
कधी लाभली
जरतारी आनंदाला
किनार दु :खाची
चांदणं भुलवा
खुणवता तुजला
राजसा मनांतरी
विरघळशील तू
मुके स्मरतांना
गंध,फुला पानात
अनुराग माझे
नुपूरांचे भास आभास
वेल्हाळतील आसपास
हाळी आठवांची
घुमेल पावा बनूनी
मी मीरा होता
तू साद दिली 
मज  मुरारी

मीनाक्षी गोरंटीवार

92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

लेखनी माझी

या काळजाच्या
 शाईने  लिहे माझी लेखनी
मांडते सदा
मोहर ,गहिवर लेखनी

लेखनी माझी
प्राजक्ता सम हळवी  धुंद
अलवार ती
मनामनाला देते आनंद

झरझरते
गुणगुणते, दरवळते
लेखनी माझी
रोज रूप नवे साकारते

लेखनी झाली
श्वास ध्यास माझ्या जगण्याचा
शान  होऊनी
प्राण झाली माझ्या स्पंदनांचा

मीनाक्षी गोरंटीवार..

92432a13e46caf5332d47f7df4e8ecc8

Meenakshi Gorantiwar

बंध

संपते मिटून ती प्रीत कसली
दरवळत नाही तो गंध कसला
क्षणात तुटती ती नातीच कसली
काटे रुतून जातो तो गुलाब कसला

बहरत नाही तो वसंत कसला
बरसत नाही तो श्रावण कसला
 झीजत नाही ते चंदन कसले
 चढत नाही तो रंगच कसला 

संपतो तो सहवास कसला
कैफ नाही तो नशाच कसला
पुसतात त्या आठवणी कसल्या
तुटतो तो सांगा बंधच कसला !

मीनाक्षी गोरंटीवार (वणी)

loader
Home
Explore
Events
Notification
Profile