Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshdivekar1614
  • 6Stories
  • 65Followers
  • 42Love
    9Views

Ganesh Divekar

poet

  • Popular
  • Latest
  • Video
a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

आई (कवीता)- गणेश दिवेकर

आई (कवीता)- गणेश दिवेकर

a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

आई (कवीता)- गणेश दिवेकर

आई (कवीता)- गणेश दिवेकर

a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

"निवडणुका जवळ येताच लबाड माकड जागी होतात
या पक्षातुन त्या पक्षात माकड उडया घेतात
वा-याची दिशा ओळखुनच ही चालतात
जनतेच्या हितासाठी वरुन अस बोलतात"

भ्रष्टाचाराने होरपळली जनता नसत कुणा देण घेण
नसत दुसर कारण
सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण
चालत फक्त राजकारण....

पक्ष एकमेकांचे वाभाडे काढतात लोकांमध्ये गट तट पडतात
तेव्हा आमचे नेते घडतात 
मागे कोण हटेना ना कोणीच येईना शरण..

शासकीय शैक्षणिक सामाजिक क्षेञांचे बाजारीकरण झाले
सामान्य जण गोर गरीब कष्ट उपसुन मेले
सांगा आर्थिक विषमतेची दरी केव्हा भरण
ज्याच्या अन्नधान्यावर देश जगतो
त्याचेच बेकारीच्या आगीने जळत इथ सरण..

पैसा उधळुन निवडणुका लढल्या जातात
पुन्हा हिच गिधाड समाज तोडुन खातात
समाजसेवेच्या  पाघरुना   खाली-गुदमरुण लोकशाहीचे होत आहे
मरण...
सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण..
चालत फक्त राजकारण
                         @गणेश दिवेकर@ राजकारण

राजकारण

a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

तुझ्या मनमोकळ्या हसण्या -बोलण्याने
माझ ह्रदय बोलत झाल..
पण तुझ्या अचानक गप्प - बसण्याने
मलाच परक केल...

@ गणेश दिवेकर @ परक...

परक...

a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

पाणीच पाणि साचले होते
काही वाहुन गेले अजुन काही वाचले होते
ओढे नद्या नाले तुडुंब वहात होते
सर्वच हताश होऊन पहात होते
जसा ईतिहासच घडत होता
धो धो पाऊस पडत होता ॥१॥

विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट
ढगांवर ढग दाटले जणु आभाळच फाटले
अनेक घर तसेच शहर उद्धवस्त झाली होती
सिमेंटच्या या जंगलावरती जणु सुनामी आली होती
प्रत्येक जण जगण्यासाठी धडपडत होता
धो धो ऊस पडत होता ॥२॥

मोठी झाडे ऊनमळुन पडली होती
शेतामधली पिक सारी पाण्याखाली दडली होती
एक चिमुकला जिवाच्या आंतकाने रडत होता
पाण्याचा प्रवाह त्याला सोबत आपल्या ओढत होता
जीव जातेवेळी तो खुप तडफडत होता
धो  धो पाऊस पडत होता  ॥३॥

दुसरा दिवस उजाडला पृथ्वी स्तब्ध शांत होती
पण सुर्य तसाच तापला होता हवा हवा वाटणा-या
पावसाने सर्वाचाच गळा कापला होता
एक मंदिर पाण्यखाली देव त्यात झोपला होता
माणसाच्या आधुनिक प्रगतीवर निसर्गच कोपला होता
कळसावरती त्याच्या झेंडा फडफडत होता
जसा इतिहासच घडत होता
काल धो धो पाऊस पडत होता ॥४॥
*तो फडकणारा झेंडा पाऊसाच्या प्रलयाची साक्ष होता**
@@@ गणेश दिवेकर @@@ पाऊस ( एक प्रलय)

पाऊस ( एक प्रलय)

a2a15cc8521969832531bb7dba87c2c5

Ganesh Divekar

कधी कधी वाटत मला
 पुन्हा एकदा ते दिवस याव
   तु माझ्या सोबत
मी तुझ्या जवळ असाव ॥

कधी कधी वाटत मला
 विचारात तुझ्याच हराव
   कळत नकळत माझे मलाच
शोधत फिराव ॥

कधी कधी वाटत मला
  चेहरा तुझा बघत रहाव
     बनुन तीळ त्याच्यावरचा
सोबत तुझ्याच जगत रहाव ॥ 

@कधी  कधी@

      *****गणेश दिवेकर******


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile