Nojoto: Largest Storytelling Platform
rupalisidugherad5253
  • 5Stories
  • 1Followers
  • 16Love
    0Views

Rupali sidu gherade

Instagram - rupaligherade

  • Popular
  • Latest
  • Video
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

निसर्गाचा सहवास मला नेहमीच हवाहवासा वाटतो शांत मंद हवेच्या झोकात हलणारी गवतफुले त्यावर बागडणारी  रंगीबेरंगी फुलपाखरे मनाला एक वेगळाच आनंद देतात, अस वाटत की तो क्षण कधी संपूच नये, माणसांच्या  कलकलाटा पासून जरा दूर,जिकडे पहावं तिकडे हिरवळ आणि फक्त हिरवळ त्यात पक्षांचा किलबिलाट ऐकून कान अगदी तृप्त होतात अस वाटत की आयुष्य हा एक सिनेमा आहे आणि त्यात सगळ्यात सुखी व्यक्ती फक्त आपण आहोत, इवली इवलीशी रोपटी आपल्याला खुणावत आहेत अस वाटत,नाजूक फुले डोकं वर काढून गालातल्या गालात हसतात की काय असं जाणवत मन एकदम धुंद होऊन जातं. निसर्गाच्या सानिध्यातून जाताना मन एकदम प्रफुल्लित होत काय बरी जादू असते त्या हिरवळीत, मनाला मात्र हिरवळ हवीहवीशी वाटते माणूस अगदी त्या निसर्गाच्या प्रेमातच पडतो.

©Rupali sidu gherade #Nature
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं

©Rupali sidu gherade #बालपण
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

एकांत माणसाला हवासा असतो पण त्यासाठी वेळ नसतो  तो वेळ काढावा लागतो स्वतः साठी कारण तिथे आपण स्वतःलाच नव्याने भेटतो, एकांतात माणसाला आपण कुठे आहोत,आपल्याला कुठे जायचं आहे हे कळत एकांतात उलगडलेली आयुष्याची घडी परत सुरळीत बसते

©Rupali sidu gherade #एकांत
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

माणसं जरी आपल्यासोबत थोड्या काळासाठी असली तरी त्यांच्या सोबत घालवलेले क्षण त्या क्षणांच्या तयार झालेल्या आठवणी मात्र कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतात.आठवणींने ते नात,ते क्षण पुन्हा-पुन्हा अनुभवल्यासारखं वाटत, तोच क्षण पुन्हा जगणं म्हणजे आठवणी. कधी हसवणाऱ्या तर कधी दुखावणाऱ्या आठवणी आसतात पण आठवणींना पडताळून घेतलं की मन अगदी कस हलकं होत, चेहऱ्यावर एक अलगद अस हसू उमटतं अशा आठवणी माझ्या आहेत याचा सगळ्यात जास्त आनंद होतो कारण आठवणी ह्या जगलेल्या क्षणांच्या प्रतिमा असतात.

©Rupali sidu gherade #आठवणी
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

नात...........नात म्हणजे नातंच असत मग ते कोणतही असो, त्याला नात रक्ताचच असावं असं काही नसतं, नात्यात प्रेम,आपुलकी, मायेचा ओलावा असला की नात्यात विश्वास निर्माण होतो व तेच नात जर जवळ असलं की नात्याची तितकी किंमत कळत नाही. जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा नात्यातील पोकळी जाणवते.जगलेले क्षण,  मारलेल्या गप्पा सगळं काही हवंहवंसं वाटत पण तेव्हा ती व्यक्तीच जवळ नसते तेव्हा नात्याची किंमत कळते. दुराव्यात वाट पाहण्याची एक वेगळीच ओढ निर्माण होते, नात्यातील प्रेम वाढत नात्यात आलेल्या दुराव्यामुळे नात्यातला आपलेपणा वाढतो. जवळ असताना न कळलेली नात्याची किंमत दुराव्याने कळते.नात्याची किंमत कळण्यासाठी थोड्या काळासाठी  नात्यात दुरावा यायला हवा.
​

©Rupali sidu gherade #Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile