Nojoto: Largest Storytelling Platform
avinashlad4153
  • 44Stories
  • 21Followers
  • 382Love
    82Views

Avinash lad

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

साथ तुझी
=============
साथ तुझी हवी होती
सुखदुःख झेलताना
आयुष्याच्या रस्त्यावर
आनंदाने चालताना

साथ तुझी हवी होती
संसाराच्या बाजारात
प्रसन्न ठेऊन हासू
तुझ्या न माझ्या सुखात

साथ तुझी हवी होती
सदैव माझ्या श्वासात
रूप काळे वा ग गोरा
फक्त तू छबी मनात

साथ तुझी हवी होती
ते आजही वाटतंय
आठवात तुझ्या मन
दाहिदिशा फिरतंय

साथ तुझी हवी होती
घरामधली वाघीण 
घालमेल करून तू
घट्ट व्हावी बिलगून

साथ तुझी हवी होती
पण नजर बोचली
दोर तुटला नात्याचा
अन् दोस्तीचं तुटली
================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ तुझी साथ..

#LookingDeep

तुझी साथ.. #LookingDeep

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

🙏🏻🙏🏻💐
गणपती बाप्पा मोरया 
=================
साऱ्यांचा तू देव गजानन
लिला तुझीच अपरंपार आहे
गरीब श्रीमतीमध्ये देवा
सुखकर्ता पहिला  तूच आहे
=================

अविनाश गणपती बाप्पा मोरया

#ganesha

गणपती बाप्पा मोरया #ganesha

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

सखी...
================
सय दाटुनिया येता
         मन धावे घरभर
        जसे लाजाळूचे झाड
                 डोई घेउनी पदर

सखा येईल येईल
    भास जागवी पापनी
         डोळा लागे वाटेवर
          हळू सोसूनिया पाणी

घुसमटीचे वादळ
      दार घेई सावरून
      लाज दिसता गालात 
         स्वप्न डोळ्यात पाहून

कंठ लागता सुरात
    देई अमृताची गोडी
      सखी हळव्या मनाची
          अंगी भरझरी साडी

लाज दार लपवितो
    सुखदुःख सावरून
       लक्ष्मी राबते घरात
         हासू सुखाचं आणून

सखी आठवात सदा
    ओढ लावून दारात
           रूप देखणे सुंदर
          शोभे आनंदी घरात

================
विठूपुत्र - अविनाश लाड,
राजापूर-हसोळ7 सखी..

सखी..

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

कोवळे मन..

#JalFlute

कोवळे मन.. #JalFlute

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आई..

आई..

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

घर..

घर..

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

अनवाणी..

अनवाणी..

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आई.₹

आई.₹

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

पाऊस...
=================
सळसळ वाऱ्यासंगे
रिमझिम पाऊस आला
शरारली अंगावर काय
देह ओलाचिंब झाला

तुझ्या आठवात बिलगून
ओढ तुझ्या मिलनाची
फोफावल्या भावनांना
छेडते  सर  पावसाची

नटलेली नभांगणी
वेड लाविते जीवाला
किलबिलाट पक्षांची
पाहुन भिजल्या देहाला

थरथरले ओठ नकळत
प्रेमफुलाच्या वेलीवर
रिमझिम पावसात होती
नजर भिजल्या देहावर

घेऊन बाहुपाशात सखे
तृप तनमनात भिजावे
गोंजारून दोन जीवांना
थेंब ओंजळीत झेलावे

एक थेंब पुरे पावसाचा
घालमेल करण्या मनाची
स्पर्श करून भावनांना
कहाणी ही दोन जीवाची
=================
@अविनाश लाड पाऊस..

पाऊस..

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

चारोळी..
=====================

मैफलित माझ्या कधीतरी
प्रिये क्षणभर येऊनिया तू बसावे...✍

खेळ असे माझ्या शब्दांचा 
भावरंग मात्र तुझ्या नयनी दिसावे...✍

=====================
@अविनाश लाड.. चारोळी..

चारोळी..

loader
Home
Explore
Events
Notification
Profile