Nojoto: Largest Storytelling Platform
mayurlangi7821
  • 34Stories
  • 207Followers
  • 322Love
    18Views

Mayur Langi

  • Popular
  • Latest
  • Video
c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

कविता वाचून झाल्यावर,
तिनेही कोऱ्या पानावर काहीतरी लिहलं,
जणू त्याच्या कवितेत,
आज तिने स्वतःला पाहिलं .....!

मयुरमेश

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

कविता म्हणे एक बहाणा आहे,
तुझ्यासोबत बोलण्याचा,
शब्दांचा आधार घेत,
तुझ्या भासांसोबत चालण्याचा ...!

कधी हसणाऱ्या कधी रडवणाऱ्या ओळी
जुन्या क्षणांची नेहमी होठांवर असते बोली,
शब्दांत रेखाटलेल्या तुला,
वाचताना नेहमी होते डोळ्यांची पापणी ओली ...!

मयुरमेश : ११-०४-२०२०

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

बायको coming soon

लवकरच येणार,
या कवीची लेखणी,
माझ्या कोऱ्या मनावर,
उमटलेय एक सुंदर देखणी ......!

तीचा निरागस प्रेमळ हसरा चेहरा,
पाहुनी दंग झाला कवी,
मनो-मणी म्हणाला,
आपल्याला हीच लेखणी हवी .....!

ती अशी असेल ती तशी असेल,
होते हजार प्रश्न मनी,
पाहुनी त्या देखण्या छबिला,
सापडलं उत्तर त्या क्षणी ........!

मयुरमेश : ०९-०३-२०२०

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

रोजचं बोलणं,
आता सवयीपर्यंत येऊन पोचलं,
या वेड्या मनाला,
थोडं प्रेमात पडल्यासारखं भासलं .....!

हसता खेळता चालता बोलता,
होठांवर तुझ्याच नावाची वाणी,
वाटे सारं काही मनातील सांगावं,
हळूच येऊन तुझ्या कानी .............!

✍️मयुरमेश

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

तुझी वाट पाहताना,
मन अगदी बैचेन व्हायचं
धडकणाऱ्या हृदयाचं आणि घड्याल्याचं,
ठोक सोबत पडायचं .....!

तुझी वाट पाहताना,
डोळे अगदी कावरे बावरे व्हायचे,
तू येणाऱ्या दिशेवर ठाम उभे राहायचे,
तुझ्या सावलीला ते दुरूनच ओळखायचे ....!

तुझी वाट पाहताना,
वेळेवर थोडा मी चिडायचो,
पटपट सरकू नये,
म्हणून तिला मी सांगायचो ......!

तुझी वाट पाहताना,
जेव्हा तुझी भेट व्हायची,
अगदी साऱ्या जगाची विसर,
तुझी एक मिठी द्यायची .......…!

मयुरमेश : १७-१२-२०१९
c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

🙏 बाप या शब्दाचा अर्थ स्वतः बाप झाल्यावर कळतो 🙏

स्वतःचा आनंद विकला गेला,
जेव्हा आपला पोरगा मोठा झाला,
बाप मात्र क्षणोक्षणी झिजला गेला,
जेव्हा पोरगा एक एक पायरी शिकत आला,

लपवून स्वतःच्या दुःखला,
पुरवत होता बाप पोराच्या प्रत्येक सुखाला,
चढता यावी त्याला आरामाची सापसीडी,
म्हणून सोडवत होता बाप पोराच्या नशिबाची कोडी,

जिंकवून दिलं त्याला सार जग,
जगण्याच्या दाखवल्या त्याला कित्येक दिशा,
बापाच्या जीवावर पोराच्या काळ्या झाल्या मिशा,
पोरासाठी झिजता झिजता मिठल्या बापाच्या हातावरच्या रेषा,

कर्तव्य पुर्ण करता करता बाप मात्र पिकला होता,
गळून पडेल झाडाचे पान म्हणून हवेच्या झोक्यासाठी मोकळा होता,
उज्वलीत करून आपल्या वंशाचा दिवा,
बाप म्हणे आता शांतपणे झोपी जावा .......!
मयुरमेश
२८-११-२०१९

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

ती कविता न्हवती,
हे तिला सांगावं लागलं नाही,
वाचताना सर्वकाही समजलेली ती,
हळूच चोरनजरेने माझ्याकडे पाही ........!

समजल होत मला,
तिने उतरून पाहिलं माझ्या मनात,
जे होठावर आलं नाही ते शब्दात मांडलंय पानात,
वाचताना हळू हळू येत होतं तिच्या ध्यानात .....!

कविता वाचून झाल्यावर,
ती म्हणे थोडी रागवली होती,
अजून करायचा ना सांगायला उशीर,
अशीच काहीतरी बडबडली होती .....!

जाता जाता म्हणे,
तिने सुद्धा कविता केली होती
तिच्या नावाची काही अक्षरे,
माझ्या नावासोबत जोडून गेली होती .......!
मयुरमेश
०९-१०-२०१९

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

पकडला गेला चोर,
चोरी करताना,
कोऱ्या पानावर निळ्या शाहीने,
तीच नाव लिहताना .....!

मयुरमेश
२०-०९-२०१९
c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

insta@mayur_langi

c086c47eaefc7dd99444ee58bc72bfb7

Mayur Langi

मी नाही म्हणत कधी स्वतःला कवी,
पण जिच्यासाठी रोज लिहतो कविता,
देवा मला फक्त तीच हवी .....!
✍️मयुरमेश #love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile