Nojoto: Largest Storytelling Platform
drsupriya6870
  • 7Stories
  • 10Followers
  • 44Love
    0Views

Dr.Supriya

  • Popular
  • Latest
  • Video
cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

वारीच्या वाटेवर....
नको ती आता भेटीत कसलीही दिरंगाई
सोबतीला माझ्या तुकोबा,ज्ञानोबा, मुक्ताई, जनाई...
नाचली पताके ध्वज आकाशात झेप घेई
जातपात नसे कुठली स्नेह जिथे वृद्धिंगत होई...
भेटण्याची आस चालण्याची घाई
टाळ चिपळ्यात गजर हरीचा होई...
पालख्या घेवुन निघाली भोई
रिंगणात माऊलीचा अश्वही धाव घेई...
तुळशी वृंदावन बाया-पोरींच्या डोई
पाऊले, कुठे फुगड्याचा खेळ वाटेवर रंगतो बाई...
नादब्रह्म ना पहिला असा देह निरंतर होई
भेटता तुज देहभाव हरवुन जाई ...
टेकतो माथा नामदेव पायरी, पदरी बांधतो साता जन्माची पुण्याई
सोनसळी कळस काय वर्णावी पंढरीची रोषणाई
गरूड खांबाची भेट न्यारी ती नवलाई
डोळ्यात कौतुक माझा देव विठाई
कर दोन्ही कटेवरी रूप ते सुखदाई
टिळा कस्तुरी, माळा गुंफल्या तुलासमंजिरी जाई-जुई
तुज भेटीचा क्षण हर्ष मानसी होई
जन्मभरचा श्वास तु विठ्ठल-रखुमाई ,विठ्ठल-रखुमाई...
                                      - सुप्रिया आपेट

©Dr.Supriya

cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

वारीच्या वाटेवर....
नको ती आता भेटीत कसलीही दिरंगाई
सोबतीला माझ्या तुकोबा,ज्ञानोबा, मुक्ताई, जनाई...
नाचली पताके ध्वज आकाशात झेप घेई
जातपात नसे कुठली स्नेह जिथे वृद्धिंगत होई...
भेटण्याची आस चालण्याची घाई
टाळ चिपळ्यात गजर हरीचा होई...
पालख्या घेवुन निघाली भोई
रिंगणात माऊलीचा अश्वही धाव घेई...
तुळशी वृंदावन बाया-पोरींच्या डोई
पाऊले, कुठे फुगड्याचा खेळ वाटेवर रंगतो बाई...
नादब्रह्म ना पहिला असा देह निरंतर होई
भेटता तुज देहभाव हरवुन जाई ...
टेकतो माथा नामदेव पायरी, पदरी बांधतो साता जन्माची पुण्याई
सोनसळी कळस काय वर्णावी पंढरीची रोषणाई
गरूड खांबाची भेट न्यारी ती नवलाई
डोळ्यात कौतुक माझा देव विठाई
कर दोन्ही कटेवरी रूप ते सुखदाई
टिळा कस्तुरी, माळा गुंफल्या तुलासमंजिरी जाई-जुई
तुज भेटीचा क्षण हर्ष मानसी होई
जन्मभरचा श्वास तु विठ्ठल-रखुमाई ,विठ्ठल-रखुमाई...
                                      -

©Dr.Supriya

cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

चालणं...   
 रोजंदारीने दिवस कसेबसे निघायचे 
टिचभर पोटाची गरज भागवायचे,
ठप्प सगळं आज ,ना कुठली कामे हातावरची
म्हणुन वाट धरली ती गावाकडची...
पण फक्त वाट मोकळी दिसली चालायची 
लोक मात्र विचित्र नजरेने पहायची,
हौस कुठे मैल न मैल चालायची
पोरं, बाळं घेवुन पायपीट करायची...
पेट्या, झोळ्यांचे ओझं डोक्यावर रेटायची
मिळेल त्या अर्ध्या भाकरीवर खळगी भरायची
शक्य तितकी मजल मारत पाऊल मात्र टाकायची...
चालुन, चालुन चपलेनेही चेष्टा करायची
झिजुन त्याला वेज पडायची ,
उन्हाच्या चटक्यांनी पार पायांवरची फोड फुटायची ...
मनातल्या जखमांना आता खपली धरायची
पण त्या वाटेवर पाऊल नाही थांबायची ,
जवाबदारीच ओझं , तिकडे पाऊल पाऊल ओढायची...
ना कुठली वशिले मिळायची 
वाटेत त्या रुतलेली काटे मात्र दिसायची ,
अशीच दिवसागणिक अंतर कापायची 
रात्रीच्या वेळी आकाशाचे छप्पर , बिछाने काळ्या रानाची
आज शिक्षा खरी वनवासाची की कुठल्या शापाची...
थकव्याने ना रुळाची ना पटरीची जाणीव असायची
अन् निजलेल्या त्या पाखरांना नवी पहाट कुठे दिसायची ,
कित्येक बळी त्या वाटेवर पडायची 
कित्येक घर तुटताना पहायची ,
वेळ काळाने आजही  मारुन न्यायची 
मनाला तर्क वेगळेच लागायची ...
श्वासही संपायचा, वाटही हरायची 
अर्ध्यातच चालण्याची स्पर्धाही थांबायची,
नशिबी ऊनच, ना कधी सावली मिळायची 
चुक श्रीमंत राजाची, सजा रंकानीच भोगायची... #InterntaionalFamilyDay
cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

वसंत....
पहाटे बिलगुनी हा गारवा
गातोय फांदीवर हा करडा निळा पारवा
फुलले तुळस-मरवा
वसंत हा किती बरवा ...
शिशिर संपला
वसंत दारी आला
नवचैतन्याचे रूप धरतीला ..
गडद लाल गुलमोहर बहरला
वाटेवरती पळसाने वणवाच पेटवला
मऊशार निळा आसमंत सारा हा पसरला..
पानं कोवळी व  मन वेडे भुलले
उधाण वारे स्पर्श करून पुढे सरसावले
कुठले सुर हे ओठांवर फुलले
ह्या रंगांनी डोळ्यांची पारणे फिटले
शृंगार करून वंसंता रूप तुझे  किती हे सजले
रूप तुझे किती हे सजले...
                 -सुप्रिया अापेट

cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

वसंत....
पहाटे बिलगुनी हा गारवा 
गातोय फांदीवर हा करडा निळा पारवा
फुलले तुळस-मरवा
वसंत हा किती बरवा ...
शिशिर संपला
वसंत दारी हा आला 
नवचैतन्याचे रूप धरतीला ..
गडद लाल गुलमोहर बहरला 
वाटेवरती पळसाचा  वणवाच पेटू लागला
मऊशार निळा आसमंत सारा हा पसरला..
पानं कोवळी वेलींना फुटली 
फुलं आत्तर लावुन दरवळली
रंगाची ही उधळण भोवताली ..
नाजुक ह्या रंगांनी मन वेडे भुलली
उधाण वारे स्पर्श करून पुढे सरसावली
कुठले सुर हे ओठांवर फुलली
ह्या रंगांनी डोळ्यांची पारणेच फिटली
शृंगार करून धरतीही सजली
धरतीही सजली...
                 -सुप्रिया अापेट

cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

दुष्काळातला शेतकरी..
आयुष्य गेलं सारं चालवत नांगराची फाळी
तरी रिकामी कशी माझीच झोळी
दिसरात्र केली रानावनात पाळी ,
  जरी होरपळणाऱ्या निखाऱ्याचे ऊन अंगालाही जाळी
  झळा दारिद्र्याच्या खोपट्यात कातरवेळी 
  सुन्या काळजाचं पाणी नितरत होतं डोळी...
 देवा कसली सत्वपरीक्षा भेटीला
 भंगता दिस चोहिकडे अंधार दाटला 
 भाळी कसा वनवास दुष्काळी टिपला...
           पावसाने कसा लपंडाव चालवला 
           मातीचाही सुंगंध हरवला
           लागला चातकही पाऊसपाणी शोधायला
           कोरड वाटे घशाला कधी पाऊस पिऊ ओला... 
इहिरी अटल्या साऱ्या,नदीची कोरडी पात्र
कवेत घेत होती जराशी ही रात्र
जीव जडला मातीपायी झिजली की सारी गात्र 
अंग झाकायला कुठे अंगभर कापड मात्र
          पावासापाय माझ्या पिकाने मान मोडली
          नुसतेच वादळवारे वावरात फिरली
          उन्हाने सारी रानंच करपली
          नुस्तं आभाळ ढगाळ ढगाळ विखुरलेली 
         उगाचच ढेकळं पायी ठेचाळलेली...
  सुख उंबराचे फुल झालेली
  नेहमी दुःख पदराशी जोडलेली...
     वेळ सोन्याची सुगीच्या दिसाची आठवलेली
   वेळ दाणं टिपुर टिपून चिमण्यांनी डांगोरा पिटलेली      
      असं कसं वेळ दुष्काळाने संधान बांधलेली,
     संधान बांधलेली...
                                   _सुप्रिया आपेट
cfa234cbb6a93e93d94b1c47c1f3f240

Dr.Supriya

गोफनेतून दगडाची पकड सुटावी 
तशी कवी मनासमोर शब्द नाचावी...
शब्दं ते कदाचित अवघडलेलेे असावी 
आणि शब्दानिही पावलोपावली चपळाई करावी ...
मेघमालेतून वीजही लखलखावी
अन् कल्पनामय काव्य कागदावरती  नकळत उत२ावी 
दिवस-रात्र् आशयाने बोलावी 
बासरीचे सुमधुर सुर दाटावी...
तत्परतेने मनाचे शब्दकवाडे उघडावी 
मंतरलेल्या ओळीत क्षण मोहरावी...
सावरलेल्या त्या क्षणात कोडी पडावी  
आभासातील कल्पनांना पाझर फुटावी...
शब्दाची पकड जुळवत मन मिश्रणाची संबळी बांधावी 
लेखणीने  भन्नाट काव्य टिपत जावी 
दोनाच्या चार ओळीत पंक्ती भासावी .......


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile