Nojoto: Largest Storytelling Platform
ajitjadhav8543
  • 7Stories
  • 41Followers
  • 27Love
    0Views

Ajit Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना पोळा सणाच्या खुप खुप शुभेच्छा.

ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

शांतता...

मुंग्याचेही लोंढे आले अन्
निरव शांतता भंगून गेली...
गावाकडची निरव शांतता
धगाधगीत दबून राहिली...
पिंपात मेले ओल्या उंदिर
माना पडल्या, मुरगळल्याविण..
भंगून गेली निरव शांतता
जगणे झाले, उदासविण...
गिऱ्हाइकाची कदर राखणे;
एवढेच माझ्या हाती उरले...
सुख शांतीच्या शोधात माझे
जीवन सगळे आता सरले...
लाभे ना कधी निरव शांतता
की ढिल्या गळा पंचम गहिरा...
आठवून मग तो गाव माझा
गात्रावरती या निघे शहारा...
सुन्न झाले मन, सुन्न भावना
लाभली ना कधी रे शांतता..
अस्थाईवर स्थाईक झाल्याशी
लाभेल एकदाची चिर निद्रिता....

     *''''''''''''''''''''अजित*
ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

#OpenPoetry रूसवा फुगवा सोडून यावे
परतूनी तू मम जीवनात...
वाट पाहत उभा राहिलो
तुझीच वेडे मी अंगणात...
मळभ दाटले काय मनात
सांग ना तू माझ्या कानात...
निरसन करेन तुझ्या शंकाचे
चुटकी सरशी मी क्षणातं...
नको धरू तू असा अबोला
पिळून माझे हृदय निघते...
दिसेनाशी होता तू सखे
गात्र गात्र माझे शहारते...
रोमा रोमात तूच गं वसली
हृदयात तुजी छबी ठसली...
नाका वरती धरून फुगवा
का गं मजवरी अशी रुसली...
अबोल झाल्यात घरभिंतीही
विचार करते तुळसही चिंती...
निघून गेलीस तू अन् इथून
त्यांनाही वाटू लागली भिती...
दूषणे देती सगळे मजला
घायाळ केले त्यांच्या प्रश्नां...
सोड राधिके तुझा रूसवा
वाट पाहे यमुनेशी हा कृष्णा....

          '''''''''''''''''''' अजित रुसवा

रुसवा #OpenPoetry

ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

केशकुंतलांचा भारा
उडवतो उनाड वारा
आठवण येता तूझी
अंगावर निघे शहारा

सविता

ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

एक एक थेंब
येऊ दे करी,
आठव पागोळ्या 
साठवू दे उरी.

अजित. पागोळ्या

पागोळ्या

ec54ab14956848b4ac3b4c80a0127a3e

Ajit Jadhav

मी व्याकुळ होतो आणि 
तू गावी मनात गाणी.
मेघमल्हार आळवुनी
नभाचे गळावे पाणी.

ही मैफिल उदास वाटे
स्वर भैरवीचेच जणू भासे,
गायनाती राग रागिणि
मजवरी का ती ना हसे...

ह्या ढिल्या गळ्यावरी
लागे ना पंचम गहिरा,
डोलू दे तूज स्वरावरी
सळसळणारा बहिरा.

मज सामर्थ्याच्या स्वरा
तूज व्यंजनाची जोड,
गातेस जे हृदयअंतरीत
त्याचेच मौन तू सोड.

आर्तता हृदयातील ह्या
गीतातुनी आळवावी,
मज कंठीची व्याकुळता
तूज स्वरातं जिरवावी.

          *'''''''''''''''''अजित* मनस्वी

मनस्वी #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile