Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणसातलादेव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणसातलादेव Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

swag

हो मला देवच भेटला होता!!

बऱ्याच जणांकडून ऐकल होत पुराण कथांत ही वाचल होत, 
अन्याय अत्याचार वाढीस लागला कि देव जन्मास येतो म्हणे, 
ऐकत असतो प्रत्येकाचे गर्हाणे पाहत असतो प्रत्येकाचे कू_कर्म सुकर्म उघड्या डोळ्याने.
तरीह मग का?
देवा दारीही न्याय निवाड्यास उशीरच होतो, उमगलेच नाही मज याचे उत्तर.
जेंव्हा कधीही मी भव्य दिव्य देवळाच्या गभार्यात
देव म्हणून उभ्या असलेल्या दगडाच्या त्या मुर्तीला,
 जेंव्हा मी  केला हा प्रश्न ती नेहमीच दिसली निरुत्तर. 
मग मात्र त्याच्या या शांततेला कंटाळून मी हा खटला त्याच्याच दरबारात मांडला.
खटल्याचा दावा होता जर तु देव आहेस, 
आणि सगळ काही पाहू शकतोस,
 तर सांग, मला एखाद्या निष्पाप जिवावर अन्याय होताना
कसा गप्प राहू शकतोस.
यावर ती निर्जीव मुर्ती मला थोडीशी खट्याळ हसल्या सारखी भासली, 
मग ती मुर्ती काही क्षण बोलतीय अशी भासली,
जणू ती म्हणु पाहत होती, 
कोण म्हणल तुला निष्पाप जीवावर होणारा अन्याय पाहून माझ हृदय द्रावत नाही.
 मला ही तो अन्याय पहावत नाही.
परंतु हेही तितकेच खरे की देव असून ही मी मात्र नसल्या सारखा.
कारण किती हीप प्रयत्न केले तरी मी एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही,
 पण म्हणून अस नही की देव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही,
जरा डोळे उघडे ठेवून बघ मी सर्वत्र आहे,
कधी प्राण्यांच्या रूपात, कधी पाण्याच्या रूपात, कधी वाऱ्याच्या ,
 कधी माणसांच्या रूपात, कधी वाळू च्या कणात, 
झाडांच्या पानात तर कधी राणात, कधी वणात
असाच तर आहे मी प्रत्येकाच्या मनात,
अहो भाग्य समजतो आम्ही आमचे,
असाच एक देव आम्ही ही उघड्या डोळ्यांनी पाहीला
माणसाच्या रूपात.
ज्याला जन्म दिलेल्या माता पित्यांची कदर होती,
थोरामोठ्यांचा आदर होता.,
जन्म घेतलेल्या मातीचा अभिमान होता,
ज्याच्या नजरेत परस्त्री साठी ही माते समान सन्मान होता,
भूकेल्यांच्या भुकेची जान होती. अनाथां बद्दल ममता होत,
ज्याच्या मध्ये अन्यायास ललकारण्याची क्षमता होती.
ज्याच्या मध्ये मला हा देवरूपी मानव दिसलं
ते दूसरं तिसरं कोणत व्यक्तीमत्व नसून,
उमाकांत मिटकर होते. 

Dedicated to : 
Hon'ble Shri Umakant Mitkar Sir.
On Birthday Occasion of 23march2024
Written by:
 Swapnali Gadhave

©swag #माणसातलादेव #होदेवभेटलाहोता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile