Find the Best व्हिलन Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutएक व्हिलन, विलन फिल्म, व्हिलन इंग्लिश चा कार्यक्रम, व्हिलन फुल मूवी, द व्हिलन,
P.Nitin
#मृत्यु.... मृत्यु..... काय असतं मरण? का घाबरतात लोकं याला?...शरीर मृत पावलं म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यु झाला अस समजायचं का?हो असंच समजतो कि आपण?पण ज्यांच्या भावना आणि माणुसकी मेलेली आहे ती ही चालती फिरती मुर्दाड शरीर आहेत? मला नाही माहित कि मेल्यानंतर माणसाची चेतना जागृत असते कि नाही?किंवा त्याची स्मरणशक्ती जिवंत असते कि नाही?पण हल्ली मला वाटतंय मी दररोज मरून जिवंत होतो कदाचित?... हो तुम्हाला वाटत असेल कि वेडा झाला कि काय हा?...म्हसनात जाऊन वेड लागलं याला बहुतेक पण तसं नाहीये.... गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रत्येक रात्री नेटकाच झोपतो तेव्हा म्हणजे जवळपास साडेबारा एकच्या दरम्यान माझ्या कानाजवळ एक आवाज येतो..... मी एका बंदिस्त खोलीत एकटाच झोपलेला आहे असं वाटतं मला त्यावेळेस... कुठूनतरी खिडकीच्या फटीतून एक घुबड घराबाहेरील बदामाच्या झाडावरून माझ्याकडे एकटक पाहत असते नी मला कुणीतरी तुझ्याकडे येणार आहे असा इशाराच देते जणु... आजूबाजूला उंदरांच्या कुरतडण्याचा आवाज नी मध्येच म्याउ म्याऊ करणारी काळीकुट्ट मांजर जणु छातीवर झडप घालते कि काय असं वाटतं.... यादरम्यानच्या स्मशानशांततेला चिरत एक कर्णकर्कश आवाज कानी ऐकू येतो... यम कदाचित जोडे किंवा चप्पल घालत नसेल अरे पुर्वी तर पादुका किंवा वाहन घालायचे हो ना!...मग त्यांचाही आवाज येत नसेल का?पण मृत्यूचा घंटानाद कुणाला ऐकू येतो म्हणा असाही?...सगळे आपल्याच मस्तीत तल्लीन... तो अचानक काळाच्या पावलाने येतो नी सफाईदारपणे त्याचं काम करून जातो... कदाचित यमाच्या येण्याचा आवाज यासाठीही कानी येत नसेल कि, मृत्यु नंतर प्रत्येक व्यक्ती कायमचीच चेतनाशून्य होऊन जाते... म्हणजे जसं आपण आपलं देहभान विसरून एखादं वेळेस बेशुद्ध होतो तसंच पण त्यावेळी कधीनकधी आपण शुद्धीवर तरी येतो मेल्यानंतर तसं होत नाही😊 पण मी ऐकलाय तो आवाज.... नेहमीचंच झालंय ते आता... गुररररर गुरररर चक्कक्क चक्कक्क शुऊऊऊ शुसससस्स भुम्म्मम भूकक्ककक्क... सुरुवातीला हळूहळू नंतर जोरात त्यानंतर अजुन जोरजोरात कुणीतरी धावत आपल्याकडे येतंय असं वाटतं नी तो आवाज अजुन वाढतच जातो इतका कि कान बहिरे होतात माझे.... मी कानावर हात ठेवून चादरीत तोंड लपवून घेतो... हळूहळू तो आवाज शांत होतो... मी हळुच चेहऱ्यावरची चादर बाजुला करून बघतो तर मला चामडी मोजडे दिसतात... पुढे हुक आणि त्यावर घुंगर... अचानक ती मोजडी माझ्या नरड्यावर येऊन दाब देतात... तो हुक माझ्या नरडीच्या आत जातो नी रक्ताची धार आणि चिरकांड्या सगळीकडे उडतात... खेळ खल्लास।।।।😢 मेल्यानंतर आत्मा जेव्हा ह्या सृष्टिवर परिभ्रमण करत असतो तेव्हा दिसतात मला माझी लोकं.... माझी कसली आपलं कुणीच नसतं कधीच या जगी... आपण एकटे आलेलो आणि जाणारही एकटेच... माझ्याजवळ घर होतं!...पैसा होता!....पद-प्रतिष्ठा होती.... काही शौक ही होते... मला फिरायला आवडायचं.... मस्त नवनवीन जागा ,वस्तू बघायला आवडायच्या.... मी अस्सल खवय्या होतो... मला कविता, लेख लिहायला नि वाचायला हि खुप आवडायचे... मी श्रवणीय संगीत ऐकायचो.... मला समाजसेवेचा हि लळा होता... आयुष्यात बरेच चढउतार पाहिलेत मी....आई वडील मित्र परिवार नातेवाईक, प्रेयसी- जी माझी कधीच होऊ शकली नाही.मात्र तिच्यासोबत असतांना आयुष्याकडून जे मिळाले ते हि नसे थोडके... इतकही कुणाला मिळतं का?त्यासाठी नशीब लागतं....म्हणुन मी कधीच थांबलो नाही... आयुष्यभर झटत राहिलो.... पण... पण माझ्या आयुष्यात अश्याकाही घटना घडल्या कि त्यामुळे माझं संपुर्ण जिवन एका क्षणात बदलून गेलं... काय होत्या त्या घटना?....गुपित... होय गुपितच... काही गुपित कधीच कुणाला कळू द्यायची नसतात...! माझंही तसंच आहे... तुम्ही समजुन घ्याल माहितेय मला....😊ते असं गुपित होतं त्याने मला आयुष्याच्या या जिवनमंथनात एकट सोडून दिलं... इतकं मोठं जग...ज्यात जीवनाचा सार दडलाय.... पृथ्वीच्या कुपीत सत्व पहुडलय... कुठेतरी एक परमजोती परमात्मा जो तत्वाने चालतो त्याचा अनुयायी बनुन तत्वनिष्ठ व्हायचंय... पण ह्या एकटेपणान मला स्वतःमध्ये अश्याप्रकारे जकडून ठेवलंय कि त्यामुळे मी असह्य झालोय... आता हि हालअपेष्टा मला सहन होत नाहीये.... माझं सगळं होतं नव्हतं ते हरवलंय...तन-मन-धन अगदी अगदी सगळं....मी सांगु कुणाला जिवंतपणी क्षणोक्षणीच मरण भोगत होतो नी मेल्यावर कुणाला सांगणार आता?...कुठेच या अंतर्मनाला शांती भेटली नाही... अगदी मेल्यावरही?.... हा एकच विचार माझ्या मनात सतत येतं असतो, जात असतो सतत आजूबाजूला घुमत असतो सावलीसारखा वावरत असतो आणि सरतेशेवटी अश्रू बनुन वाहत राहतो डोळ्यातुन नी एकाक्षणी गोठून त्याचा बर्फ बनुन जातो नी तो भलामोठा बर्फाचा खडा माझ्या छातीवर जमा होतो... मला मेल्यानंतरही सुख भेटलं नाही... सुख ते असतं तरी कशात... खरं तर मला शांतता हवी होती पण ती मेल्यावरही भेटली नाही... आता त्याचीही इच्छा राहिली नाही... मेल्यानंतर इतकंच कळलं कि, जगणं म्हणजे अस्तित्वाची लढाई जन्मभर... जिवन एक अशांत यात्रा आहे आणि आपण यात्रेकरू... पुर्वीपासून अनादी काळापर्यंत जोपर्यंत आपला अंत होत नाही तोपर्यंत... आणि माझा आत्मा आता अशांत आहे तो शोधत फिरतोय या अंतराळात शांती... ती तुमच्याकडे तर आली नाही ना... हरवलीय म्हणुन विचारलं!... #बस_बाकी_काही_नाही.... #व्हिलन #म्हसणजोगी #भुत्या #रावण #महाकालकादास #गरुडा #भैरवरुद्रतांडव ❤🦅🤘
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited