Find the Best माझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माझ्या की आयेगी बारात पिक्चर, लग्न करतो की माझ्यासोबत, माझ्या सोबत लग्न करते का, माझ्या सोबत लग्न करता का, माझ्या बरोबर फिरायला येते का,
Jk
भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण महिला-मुलींनी कितीही राख्या बांधल्या तरी त्यांची रक्षा होत नाही हेच दुर्दैव 😓 ©Jk #माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought
#माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought #मराठीविचार
read moreशब्दवेडा किशोर
#माझ्या श्री स्वामी समर्था...... तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पूरत नाही एकेक मणी मोजून अन् नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तु अन् ब्रम्हांड व्यापूनही उरलेला तु मग अशा तुझ्या विश्वरूपी स्वरूपाला समजावं तरी कसं ? अन जपाच्या त्या एका माळेत तुझ्या विश्वव्यापी स्वरूपाला मोजावं तरी कसं ? जपमाळ म्हणजे एक अवीट बंधन मनाला स्थिर करण्याचं ते आहे साधन मजला या बंधनापल्याड जायचंच तुझ्या अखंड नामात रंगुन जायचंच नाम यावं तुझं माझ्या मुखात अगदी सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नामजयघोष व्हावा फुलाबरोबर जसा असतो मधुगंधस्वरूप सुवास @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
#श्री_स्वामी_समर्थ #माझ्या #जीवनअनुभव
read moreशब्दवेडा किशोर
#माझ्या आयुष्याची मोहनमाळ डोळ्यात दिसले मला प्रतिबिंब रांगोळीचे टिंब अंगणात |१| दारात सजली सुंदर रांगोळी कष्टकरी मोळी डोक्यावर |२| प्रभातेच्या वेळी|काकड आरती| मनी फुलविती भक्तीरस|३| न्हाहुन निघालो भक्तीच्या रसात भुपाळी मी गात त्या प्रहरी|४| सारे वयोवृद्ध दिडिंत निघाले तल्लीन ते झाले भजनात |५| वाजवी मोहन ती मोहनमाळविणा पार नाही सुना मग मारुतीचा |६| @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ
#माझ्या_आयुष्याची_मोहनमाळ #जीवनअनुभव
read moreशब्दवेडा किशोर
#माझ्या सख्या श्रीकृष्णा...... सदा एकच भिती मज वाटे माझ्या सख्या श्रीकृष्णा संसार सागरी पोहता ना अनाहूतपणे तुटेल माझ्या श्वासांची दोरी अन् मग घडणारंच नाही देवा मग परत कधीच तुझ्या राऊळाची वारी माझ्यावरची सर्व संकटं देवा तुच वरचेवर सदा झेलले माझ्या डोळ्यातील आसवं सुद्धा देवा तु अलगद पुसले अन् तेव्हा तुझ्याही डोळ्यात क्षणभरासाठी मज तेच आसवं जाणवले माझ्या डोईवर हात ठेवून तेव्हा मजला देवा तु म्हणालास की असेन सदा मी साथीला संसार सोडू नकोस पार्था फक्त एक काम कर तुझ्या श्वासांच्या दोरीवर सदा माझं नाव झुलत ठेव अन् तुझ्या चित्त पटलावर सावळं मनोहारी रूप माझं सतत फुलत ठेव देईन तुजला सदा मी दर्शन अन् आनंदी ठेवीन आयुष्यरुपी कानन करीन तुझी सफल प्रत्येक वारी अन् देईन मोक्षवरदान तुजला तेव्हा जेव्हा असशील तु अनाहूतपणे अवेळी मृत्युच्या दारी.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #janmaashtami
#janmaashtami #माझ्या #जीवनअनुभव
read moreशब्दवेडा किशोर
#माझ्या मनातले कळत नाही.... हा आजकालचा पाऊस सायंकाळ शिवाय पडत नाही तिच्या मनातले बहुतेक कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... दुपारच्या उन्हात सावली कालवून बनवावे वाटते सुगंधी स्वप्नं अशात ती माझ्या सोबत असताना तिने रहावे मिठीत मग्न कोरत रहावी मी धुंदीची कविता स्पर्शाच्या बोरूने तिच्या मुलयम त्या हातावर अन् पावसाच्या चाहुलीने तिने ओठ टेकवावे माझ्या ओठांवर पण नेमकाच साला हा पाऊस मिठी असताना कोसळत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... पेरणी बिरणी ठीक आहे राव पण जोडप्यांचाही विचार करावा त्याने दोनच रोपटी असली जरी रानात थोडं का होईना झिरपावं त्याने पाऊस पडायला लागला रे लागला की ती माझ्यात वितळायला लागते अन् तिच्या देहाची कस्तुरीसुद्धा हवेत छान दरवळायला लागते पण बरोबर अशाच वेळी हा पाऊस माझी प्रार्थना ऐकत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... चिखल होतो पाणी साचते तिच्या पायातले पैंजण वाजते पावसात भिजताना पदर उडतो मग ती कसली सॉलिड लाजते तिच्यावरला सारा पाऊस मला अंगावर घ्यायचा असतो म्हणून भेटल्यावर रोज दुपारी पावसाला मी ये रे पावसा म्हणतो पण या भाऊला नेमक्या वेळी माझी तगमग दिसत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #पाऊस_आणि_प्रेम
शब्दवेडा किशोर
#माझ्या मनातले कळत नाही.... हा आजकालचा पाऊस सायंकाळ शिवाय पडत नाही तिच्या मनातले बहुतेक कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... दुपारच्या उन्हात सावली कालवून बनवावे वाटते सुगंधी स्वप्नं अशात ती माझ्या सोबत असताना तिने रहावे मिठीत मग्न कोरत रहावी मी धुंदीची कविता स्पर्शाच्या बोरूने तिच्या मुलयम त्या हातावर अन् पावसाच्या चाहुलीने तिने ओठ टेकवावे माझ्या ओठांवर पण नेमकाच साला हा पाऊस मिठी असताना कोसळत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... पेरणी बिरणी ठीक आहे राव पण जोडप्यांचाही विचार करावा त्याने दोनच रोपटी असली जरी रानात तरीही थोडं का होईना झिरपावं त्याने पाऊस पडायला लागला रे लागला की ती माझ्यात वितळायला लागते अन् तिच्या देहाची कस्तुरीसुद्धा हवेत छान दरवळायला लागते पण बरोबर अशाच वेळी हा पाऊस माझी प्रार्थना ऐकत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... चिखल होतो पाणी साचते तिच्या पायातले पैंजण वाजते पावसात भिजताना पदर उडतो मग ती कसली सॉलिड लाजते तिच्यावरला सारा पाऊस मला अंगावर घ्यायचा असतो म्हणून भेटल्यावर रोज दुपारी पावसाला मी ये रे पावसा म्हणतो पण या पावसाला नेमक्या वेळी माझी तगमग दिसत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मनातील_वादळ
शब्दवेडा किशोर
#माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मी मलाच माझ्या जगण्याबद्दल विचारत आहे मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे माझं अस्तित्व अन् वास्तव हे कसं,कधी अन् का बनलं विस्तव याची दिशा अन् दशा बघत आहे हे कुणाला विचारावे किंवा सांगावे माझ्या मनात चालु हे कांगावे मी कधी हरलो-जिंकलो नाही अन् कधी थकलो-बहकलो नाही भ्रम-संभ्रम,भास-विरोधाभास यातील फरकाचे होईना आभास तेच जुनं शापीत जीणं नव्यानं जगत आहे मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे........ स्वतः जगत गेलो व इतरांनाही जगवत गेलो पण खोट्याने जगलो नाही तरीपण सदा रित्या ओंजळीनं वेगवेगळ्या स्वरूपात आकार घेत आहे मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे........ कधीतरी मला कुणी समजावुन सांगेल वाटले कधीतरी कुणी मलाही धीर देऊन जगवेल पण बरेचदा ते अल्पसमज ठरले म्हणून मग दरवेळी खचुन पुन्हा नव्यानं उभं राहुन मीच मला समजवुन पुन्हा जीवनाचे नवे डाव थाटले आता नव्यानं मी पुन्हा जगण्याचे कारण शोधतो आहे मी माझ्यातल्या चुका बुजवुन माझंच नवं रूप शोधतो आहे अन् आता मी कोण अन् कसा होतो हा माझाच शोध नव्यानं घेत आहे........ @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #पाऊलखुणा_माझ्या_अस्तित्वाच्या
#पाऊलखुणा_माझ्या_अस्तित्वाच्या #Life
read moreManavazhagan
माझ्या प्रिय तरुण, नैतिक विचारांचा विचार करा आणि तू कधीही खाली पडणार नाहीस. वंदे मातरम, भारत चिरंजीव. ©Manavazhagan #माझ्या प्रिय तरुण, नैतिक विचारांचा विचार करा आणि तू कधीही खाली पडणार नाहीस. वंदे मातरम, भारत चिरंजीव.#youth #india #motivatation
#माझ्या प्रिय तरुण, नैतिक विचारांचा विचार करा आणि तू कधीही खाली पडणार नाहीस. वंदे मातरम, भारत चिरंजीव.#youth #India #motivatation #मराठीप्रेरक
read moreSunil Zarikar
कोणी माझ्या मनात लपलयं रे.. काळजाची धडधड वाढवतयं रे.. डोळ्यांच्या पापण्यांनी घायाळ करतयं रे.. स्वप्नात येऊन ओठांवर हसु उमटतोयं रे.. काळ्या काळ्या केसांत मला अडकवतयं रे.. तिच्या ह्या नखरयांनी मला गुलाम बनवलयं रे.. कोणी माझ्या मनात लपलयं रे.. मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... #मनात #माझ्या #collab #yqtaai लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #YourQuoteAndMine
मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... #मनात #माझ्या #Collab #yqtaai लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #YourQuoteAndMine
read moreSujata Darekar
माझ्या वाट्याला आलेल्या दुःखाची आहे मीच भागीदार सुखाचाच वाटा हवासा त्यांना जरी नकारतील साथीदार दुःख अपुले गिळून मग मी ही चेहरा मिरवते हसरा फार आणि तोच चेहरा वाटतो सर्वांना खराखुरा नि चमकदार एकीकडे म्हणतात सगळी दुःख वाटता हलके होई भार रडकथा अशी नामावली देऊन हसतात नंतर सफाईदार कळे ना कसा या माणुसकीला चिकटला हा किट्ट अंधार प्रकाश जेव्हा पडेल डोकी; खुलेल भूलोकी स्वर्गाचे द्वार नको कुणाचा पैसा आडका शब्दच असता किंमती फार पैसापेक्षाही नाती मनाची जीवनी ठरते अनमोल आधार नमस्कार मंडळी मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे माझ्या वाट्याला आलेलं... #वाट्याला #माझ्या #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
नमस्कार मंडळी मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे माझ्या वाट्याला आलेलं... #वाट्याला #माझ्या #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more