Find the Best परिणामस्वरूप Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutपरिणामस्वरूप का अर्थ in hindi, परिणामस्वरूप meaning in hindi, परिणामस्वरूप का मतलब, परिणामस्वरूप का अर्थ, परिणामस्वरूप meaning in english,
Ram Rajput
#हर_हर_महादेव च्या ऊर्जा संपन्न नावाने सुरूवात करूया.. #साधुसंत,ऋषीमुनी,घनघोर तपस्वी यांचे अखंड यज्ञ आणी तपस्या यांच फळस्वरूप म्हणजे पृथ्वीतलावर औंढा नागनाथ सारख्या पवित्र शिवालीक असलेल्या भुमीवर एक क्षमाशिल, कर्तव्यशिल,सर्वशिल यांच मिश्रण म्हणजे राजकुमार सुशिल नामक असामान्य बालकाचा👶🏻 जन्म झाला...या हर्षसंप्पन्न दिनाच्या उत्साहात सर्वत्र नगरभरात कचोरी नामक स्वदिष्ट भोजनाच आयोजन करण्यात आलं... #न्याय_अन्याय,धर्म_अधर्म,निष्ठा यांच्या अभ्यासात राजकुमार कुशल होतेच, शिवाय अप्रतिम_चित्रकैद📸 नावाचा छंद त्यांच्या आयुसोबत वाढत होता... #त्यांच्या चित्रप्रियतेची छटा आजही त्यांचे मित्र अघोरी, दुष्ट,अमानुष महामुनि गोपाल यांच्या चित्रहरण यंत्रात📲 शोध घेतल्यास दिसुन येते... #राजकुमारांच्या पायाला आता महल कमी पडु लागल होत.. राजकुमारची चातक बुद्धि आता औंढानगरिच्या अभ्यासशालेच्या चार भिंतीत समावनारी नाहीत हे जेष्ठ राजकुमार शैलेश यांच्या सर्वभेदी दृष्टीला दिसुन आल होतं ... #परिणामस्वरूप उच्च अध्ययनासाठी राजकुमार सुशिल अनेक महारथिंची कर्मभुमी म्हणुन ओळखले जानारे संभाजीनगर या राष्ट्रात आपल्या कर्तुत्वाची छाप सोडण्यासाठी आले... #चिरचरचकित तेजस्वी चेहरा,अतिआकर्षक शिरीर,वायुच्या गतिने उडनारे मऊ केश,आणी धारण केलेले मौल्यवान वस्त्र अशा सर्वगुणसंपन्न राजकुमार सुशिलची चर्चा नगरात सर्वत्र होती..नगरातील राजकुमारिंच्या शृंगाराचे एकमेव कारण म्हणजे राजकुमार सुशिल होते...मात्र राजकुमारला आकर्षण होतं ते फक्त कचोरीच.... #सिल्लोड प्रांताचे प्रेमभंग_अभ्यासात पारंगत असलेले "राजे" अमोल आणी "राम"(कलीयुगी),अदृश्य_प्रेमअभ्यरास निपुर्ण राजे "कृष्णा"(कलियुगी).. सर्वव्यापी_प्रेमअभ्यास संपन्न महाराज "शैलेश", शिवाय अविचारीक_प्रेमअभ्यास पारंगत सेलुनिवासी सम्राट "अशोक", आफत_विद्याधारक सुलतान आफतखान ("बद्रिविशाल:) अशा सर्वव्यापी राजांच्या छत्रछायेत राजकुमार सुशिल चे प्रशिक्षण संपन्न झाले.. #आज भगवान सुर्यदेव पृथ्वी प्रकाशित करण्यासाठी नव्हे तर राजकुमार सुशिलच्या जन्माची आठवण करून देण्यासाठी उगवले असावेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.... #चंद्र,सुर्य,आकाश,पृथ्वी, अग्नि,वायु यांची ऊर्जा एकवटुन तिचा संचार आपल्या पवित्र आत्म्यात होवो अशी प्रार्थाना मी या ऊर्जास्रोतांना करून राजकुमार सुशिल यांच्या जन्मोत्सवाचं शुभचिंतन करून हर हर महादेव या ऊर्जासंपन्न नावाचा पुन्हा उच्चार करतो..🥳🎂💐 #birthday..
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited