Best माझ्या_लेखणीतून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझ्या_लेखणीतून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाझ्या की आयेगी बारात पिक्चर, लग्न करतो की माझ्यासोबत, माझ्या सोबत लग्न करते का, माझ्या सोबत लग्न करता का, माझ्या बरोबर फिरायला येते का,

  • 5 Followers
  • 28 Stories

शब्दवेडा किशोर

White काळ लागलेलाच असे सदा मागे..
शब्दवेडा किशोर 
काळ लागलेलाच असे सदा मागे 
हाती घेऊनिया नशिबाचा चाबुक 
दाखवी तो सदा मरणाचा
अपुल्या जीवासी तो धाक
होत नाही कधी खोटी नियतीची
ती भाग्याक्षरांची बघा वाणी 
कालचकराच्या विचित्र गाठीत
फसल्यावर होते जीवाची हानी

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

a-person-standing-on-a-beach-at-sunset तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे
शब्दवेडा किशोर 
तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे
अबोल्यात बांधलेले तू भाव माझे 
आत हृदयाच्या ठेवलेस तु जरी कोरून तरीही
नकळत रेखाटतेस सगळीकडेच नाव माझे         ||१||
तुझ्या स्पर्शात शहारलेले नाव माझे 
अधीर एकवटलेले तू भाव माझे
करतेस सांत्वन उसण्यापरी स्वतःचे 
तरीही चोरून चोरून तु सदा घेतेस नाव माझे       ||२||
तुझ्या आवाजात मोहरलेले नाव माझे 
ठेवतेस हृदयी जपूनिया कायम
आवरून उधाणलेले भाव माझे 
असतो गुलमोहर तुझा तुझ्या मनोअंगणी 
तरी हातातल्या तुझ्या प्रेमाच्या परडीत
तू फुलवतेस नाव माझे                           ||३||
तुझ्या रातीत असे चांदण्यानी 
गोंदलेले नाव माझे 
तुझे ते स्वप्न जरी तरी तुला लागलेले
सत्यात आसुसलेले भाव माझे 
भोवती असतो बिलगून झोपेचा पाश जरी तरीही
स्वतःच्या धुसर नजरेत स्पष्ट पाहतसे नाव माझे      ||४||

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

k_c_writes_96k

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile