Nojoto: Largest Storytelling Platform

Best गं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माँ गंगा की शायरी, गंगा की कविता, गंगा नदी पर शायरी, गंगा नदी पर कविता, बाल गंगाधर तिलक पर कविता,

  • 19 Followers
  • 52 Stories

Shilpa ek Shaayaraa

केवडयाचा गंध तुझा, सावळा हा रंग गं..
प्रेमामध्ये सखे तुझ्या, झालो मी दंग गं..
स्वप्नाचा राणी माझ्या, करु नको भंग गं..
साता जन्मी लाभो मला, सखे तुझा संग गं..
घालतोय साकडे देवा, केले आहे तंग गं..
तुलाही लागावा सखे,, माझाच छंद गं..
#Shilpa #Kevda #KuchhTaarifeApniBhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358

Krishna Rathod

funny विनोदी jokes poem कविता comedy कॉमेडी इंटरनेट डाटा data # काल बेलेन्स सम्पला होता म्हणून कॉल नहीं केला

read more
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणून तुला त्रास नही दिला* 
*आठवण येत होती पण साठवण जास्त*
*होती म्हणून त्रास नही दिला*
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणून तुला त्रास नही दिला*
*तू कशी आहेस गं*
*हसतेस फक्त माझ्यावर*
*मला तर राग आला होता*
*नेटवर्क च्या कम्पनी वर*
*काल डाटा सम्प्ला होता*
*म्हणून त्रास नही दिला*
*खूप मिस केलं गं तुला*
*अक्षरशः मोबाईल हि सांगत होता*
*तू तिला अजून हाय कसा नही केला*
*खरच सांगतोय गं मी तुला*
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणूनच तर त्रास नही दिला*
---------------------------------------------------------------------
          *कवी*-तुमचाच कृष्णा राठोड                                 
--------------------------------------------------------------------- #funny #विनोदी #jokes #poem #कविता #comedy #कॉमेडी #इंटरनेट #डाटा #data #
काल बेलेन्स सम्पला होता म्हणून कॉल नहीं केला

SK

Love😍 #poem

read more
तुझी इतकी सवय झाली आहे की
ते समजतं अन उमजत नाही गं मला
तुझे बोलणं हवंहवंसं वाटते
तुझ्या आठवणीनं मन अनं हृदय व्याकुळ होते
थोडं का होईना तू माझ्याशी बोलतेस असे वाटते
हृदयापासून एखादी तरी हाक मारतेस,
कितीतरी मनाला सावरतोय 
पण आवरताच येत नाही मला... 
काय करु तुझी एवढी सवयचं झालीयं,
मन कधींच तुझं होऊन गेलंय हे
कळलंच नाही गं मला..
मी तुझा कोण आहे का नाही माहीत मला
माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस
वचन देतो तुला विश्वास ठेव किंवा नको
पण भविष्यात खुश ठेवेन तुला
कारण तुझ्याचं हृदयात अडकलयं मन 
अनं माझ्या दिलाची धडधड आहेस
फक्त तू अनं तूच....
कारण तुझी इतकी सवय झालीय गं... Love😍

Yogesh Hiwrale

"लोकांच्या नजरा"###

read more
"लोकांच्या नजरा मला छळतात गं
 जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं
 बघून तुला ना, येई पाठी.
  शक्य नसे ते ,कुणाही साठी.
  रीत जुणी ही सांगू किती.
 सौंदर्य जेथे ,जडते प्रीती
 अलगद, माझ्याकडे पाहू नको गं
 भाव मनाचे ते कळतात गं....
लोकांच्या नजरा मला छळतात गं.... 

श्रुंगार कशाला ,या रुपाला
देह लाजवील, रती यौवनाला
मृग नयनी तू ,स्वैर बाला
अग्नी काठी, मद्य प्याला
काळोख्या राती फिरू नको गं
ताऱ्यांची मनेही जळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं....

कुठे ठेवू हा चंद्र झाकून
राहील कसा तो नभा वाचून
सुरेल जणू तू एक मैफील
राहील कोण कसा मग गाफील
आल्हाद अशी हसू नको गं
संदर्भ फुलांचे जुळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###

Kishor Rokade

read more
उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ
आता कान्हा नाही येणार गं..!
कुठवर आस तु धरशील 
या विकलेल्या वर्तमान पत्राशी गं.!
रक्षण कोणते मागत आहेस..
भरलेत दु:शासन दरबारात गं..!
स्वतः जे निर्लल्ज पडलेत
ते अब्रु तुझी कशी वाचवतील गं..!
उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ
आता कान्हा नाही येणार गं..।।१।।

काल पर्यंतचा आंधळा राजा
आता मुका आणि बहिरा गं..!
ओठ शिवलेत लोकांचे
आहे कानावर पहारा गं..!
तुच सांग ही अश्रु तुझी 
कोणाला काय समजवणार गं..!
उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ
आता कान्हा नाही येणार गं..।।२।।

सोड मेहंदी आता बाहु संभाळ
स्वतःचीच लज्जा वाचव गं..!
डाव टाकुनी बसलेत शकुणी
मस्तक सारे विकतील गं..!
उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ
आता कान्हा नाही येणार गं..।।३।।
      *अटलबिहारी वाजपेयी
 *मराठी अनुवाद श्री:किशोर ज्ञा.रोकडे.

vikas pingale

#OpenPoetry मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !
मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !
मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!
मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण
मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार
मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे
मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते
मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

संदिप खरे #मैत्रीण

SK

वाट पाहतोय..

read more
आपणचं ठरवल होत ना गं कि,
एकमेकांची साथ कधीचं सोडायची नाही,
पण, 
आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले,
अन्, 
आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले..

कधीतरी विचार कर गं परत येण्याचा,
दाखविलेलं एक तरी स्वप्न पूर्ण करण्याचं,
मी काही नाही बोलणार तुला,
तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर,
मी स्विकारेन तुला सगळ्या तुझ्या अटी, सुख-दुःखा सहित,
नको देऊस सुख मला,
पण असं एकट तरी नको सोडून जाऊस.

माहित आहे गं मला,
तू फार जिद्दी आहे,
नाही येणार तू परत तरी मी वाट पाहत राहीन तुझी,
या जिवात श्वास असेपर्यंत,
आणि श्वासाचा अंत होईपर्यंत.
फक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेऊन. वाट पाहतोय..

praju

read more
आई-अस्तित्व।  
                      
तुझ्या पासून आई गं
जन्म माझा झाला, 

तुझ्या वाचून आई गं
माझ अस्तित्व पूर्ण होईना.....

Ajit Jadhav

रुसवा #OpenPoetry

read more
#OpenPoetry रूसवा फुगवा सोडून यावे
परतूनी तू मम जीवनात...
वाट पाहत उभा राहिलो
तुझीच वेडे मी अंगणात...
मळभ दाटले काय मनात
सांग ना तू माझ्या कानात...
निरसन करेन तुझ्या शंकाचे
चुटकी सरशी मी क्षणातं...
नको धरू तू असा अबोला
पिळून माझे हृदय निघते...
दिसेनाशी होता तू सखे
गात्र गात्र माझे शहारते...
रोमा रोमात तूच गं वसली
हृदयात तुजी छबी ठसली...
नाका वरती धरून फुगवा
का गं मजवरी अशी रुसली...
अबोल झाल्यात घरभिंतीही
विचार करते तुळसही चिंती...
निघून गेलीस तू अन् इथून
त्यांनाही वाटू लागली भिती...
दूषणे देती सगळे मजला
घायाळ केले त्यांच्या प्रश्नां...
सोड राधिके तुझा रूसवा
वाट पाहे यमुनेशी हा कृष्णा....

          '''''''''''''''''''' अजित रुसवा

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#OpenPoetry

read more
#OpenPoetry विरहाच्या दुःखात रडताना 
मला कोणीच नाही गं आवरलं 
कसंबसं माझं मीच तेव्हा 
स्वतःला सावरलं, 

एकटं असताना पेन आणि डायरी 
आपल्या सोबत घेतलं 
आणि तुझ्याच आठवणीत 
कविता करायला लागलो, 

त्या लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मात्र 
तुझाच चेहरा आठवावं लागलं 
आणि एक -एक शब्द लिहिताना 
मला खरंच रडावं लागलं, 

नसतं गं एवढं सोपं 
कविता लिहिणं 
त्या आठवणींच्या कविता लिहिताना 
मला रात्र रात्र जगावं लागलं... (प्रीत )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile