White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला मजपासुनच दूर तकर राहिले सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर