Nojoto: Largest Storytelling Platform

हळूच चांदणे आले नभावरी पसरले । मनात हळूच माझ्या का

हळूच चांदणे आले
नभावरी पसरले ।
मनात हळूच माझ्या
काव्य हे विस्फुरले ।।

संधेला अलविदा करुनी
धूरा घेतली हाती ।
ईवल्या ईवल्या चिमुकल्यांना
माई अंगाई गीत गाती ।।

रम्य ते आभाळ नटले
असंख्य तारकांनी ।
जशी बाग ही नटते
फुलपाखरांनी ।।

चिडीचूप शांतता नि
मीच जागा एकटा ।
निशेस सांगतो मी
हृदयीची सुंदर कथा ।।

कोणी घेती चहा नि
कोणी घेती काॅफी ।
जागलो मी आज खूप
वैद्यराज मागतो मी माफी ।।

©Mangesh P Desai
  #हळूच चांदणे आले...

#हळूच चांदणे आले... #मराठीकविता

2,374 Views