Nojoto: Largest Storytelling Platform

लई दिसाचं रान तान्हेल जातंय करपून कोळशावाणी ये रं


लई दिसाचं रान तान्हेल
जातंय करपून कोळशावाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

मिरोग संपून महिनाभर झाला
न्हाई अजून हित थेंब बरसला
अवस्था आमची केविलवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

वाढवेळ झाला पेरणी उरकून
बिया बी येऊ लागल्या माती उकरून
आग ओकाया लागला सूर्य आगीवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

कोठं कोठं म्हणे तू महापूर आणला
आमच्याच माथी का मग हा दुष्काळ हाणला?
बरसतुया तिकडं तू ढगफुटीवाणी
ये रं पावसा ये रं पावसा
हाक आमची ऐक दीनवाणी..!

©कविराज धनंजय
  #दुष्काळ 
#
#कविराज_धनंजय 
#KhulaAasman