Find the Best कविराज_धनंजय Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकविराज की उपाधि, धडकन धनंजय के वीडियो, धड़कन धनंजय के गाना, धडकन धनंजय के बेवफाई गाना, इक़्बाल धनंजय के गाना,
कविराज धनंजय
कुणी येण्याचं सुख आणि कुणी जाण्याचं दुःख दोन्हीही क्षणिक असतात.. कारण साजरा केलेला आनंद, व्यक्त केलेले दुःख फक्त काही काळापुरते मर्यादित असते..! ©कविराज धनंजय #दुःख #कविराज_धनंजय #titliyan
कविराज धनंजय
लोभ इतकाच माझा की शब्दांची शब्दांशी जुळवणी करतो चुकून होते मग त्यांची कविता पण तरीही मीच का गुन्हेगार ठरतो... ©कविराज धनंजय #कविराज_धनंजय #phool
कविराज धनंजय
नशिबाने जसा दिला तसा आकार घेत राहिलो मी, खूप सांभाळून घेत होतो तरीही घसरत राहिलो मी, कुणी विश्वास तोडला माझा तर कुणी मन, पण लोक म्हणत राहिले की बदलत चाललो मी..! ©कविराज धनंजय #मी #कविराज_धनंजय #Khushiyaan
कविराज धनंजय
देह दुःखाचा झाकून सदैव पांघरूण सुखाचे झाकत राहिला अनंत यातनांचे जरी उरात काटे तरीही बाप माझा मी हसताना पाहिला... होऊन आमचा आधारस्तंभ सर्वांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला हरला जरी कित्येकदा तो डोळ्यात मात्र त्याच्या थेंब नाही पाहिला... सोडून स्वतःची स्वप्ने वार्यावर आम्हासाठीच तो आजवर झिजत राहिला नाही सोडला त्याने संयम कधीच निःस्वार्थपणे तो जगताना मी पाहिला... गेला दूर जरी देहाने आमच्यापासून तत्वनिष्ठेने तो हृदयात आमच्या राहिला जळला जरी तो सरणावर आज पाणी डोळ्यातले आमच्या पुसताना मी पाहिला... ©कविराज धनंजय #बाप #कविराज_धनंजय #FathersDay
#बाप #कविराज_धनंजय #FathersDay
read moreकविराज धनंजय
लई दिसाचं रान तान्हेल जातंय करपून कोळशावाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! मिरोग संपून महिनाभर झाला न्हाई अजून हित थेंब बरसला अवस्था आमची केविलवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! वाढवेळ झाला पेरणी उरकून बिया बी येऊ लागल्या माती उकरून आग ओकाया लागला सूर्य आगीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! कोठं कोठं म्हणे तू महापूर आणला आमच्याच माथी का मग हा दुष्काळ हाणला? बरसतुया तिकडं तू ढगफुटीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! ©कविराज धनंजय #दुष्काळ # #कविराज_धनंजय #KhulaAasman
#दुष्काळ # #कविराज_धनंजय #KhulaAasman
read moreकविराज धनंजय
शांत सांजवेळी अंगणी गंध पारिजातकाचा आला सुमधूर तिच्या पैंजणाने वाराही इथला हळूच शहारला... ©कविराज धनंजय #सांजवेळ #कविराज_धनंजय #KhoyaMan
#सांजवेळ #कविराज_धनंजय #KhoyaMan
read moreकविराज धनंजय
किनार्यावर समुद्राच्या एकटाच सोबती एकांताच्या असंख्य वेदना उरात घेऊन बसलोय सानिध्यात निसर्गाच्या ©कविराज धनंजय #एकांत #कविराज_धनंजय #Ambitions
#एकांत #कविराज_धनंजय #Ambitions
read moreकविराज धनंजय
आयुष्याच्या वेलीवर फुललेलं सुंदर फुल म्हणजे तू त्या फुलातून वार्यावर पसरणारा गंध म्हणजे तू..! समुद्राला जशी साथ किनाऱ्याची आधार तोच माझा म्हणजे तू अंधार्या वाटेत इवलासा प्रकाश देणारा तो काजवा म्हणजे तू..! सुखासाठी निरपेक्ष राहून दुःखातला हातातला हात म्हणजे तू वाळवंटात पाय भाजताना मिळालेला थंड गारवा म्हणजे तू..! तूच माझे शब्द तूच माझा अर्थ माझी प्रत्येक कविता म्हणजे तू तुझ्यावीण नाही जीवन सखे जीवन माझे म्हणजे तू..! अशीच चिरंतन राहो आपली साथ प्रत्येक क्षणाची सोबत म्हणजे तू आस तू ध्यास तू, तूच माझा श्वासही जगण्यातला विश्वास म्हणजे तू..! ©कविराज धनंजय #तू #कविराज_धनंजय #KhoyaMan
कविराज धनंजय
वेदनेत माझ्या काहींना सुगंध अत्तराचा येत होता चालले जात होते दुरूनच सारे इतका प्रचंड गंध आसवात होता.. ©कविराज धनंजय #वेदना #कविराज_धनंजय #Raftaar
कविराज धनंजय
कधीकाळी पावसाच्या थेंबात तुझा सहवास होता वार्याच्या झुळूकेवर हृदयाचा माझ्या प्रवास होता पडणार्या सरी जणू प्रेम होऊन बरसत होत्या हलकेच उमलणार्या कळ्या पावसात पहिल्या भिजत होत्या ओल्या मातीचा गंध लेऊन वाराही इथला गंधीत व्हायचा इंद्रधनूच्या सप्तरंगाने त्या आसमंतही सारा रंगीत व्हायचा प्रत्येक पाऊस पुन्हा नव्याने आजही त्या क्षणांना आठवून देतो भेटीगाठी दिन रातीच्या आजही मनात या पाठवून देतो ©कविराज धनंजय #पाऊस #आठवण #कविराज_धनंजय #raindrops
#पाऊस #आठवण #कविराज_धनंजय #raindrops
read more