Nojoto: Largest Storytelling Platform

White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले मन भरून

White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पावसाळे येऊनिया गेले
भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेल कारण
पाऊस सोडून त्याला कुणीच पाहिलं नाही
तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं अन् मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच
रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कितीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर
मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातचं काहीच न राखता थेट
सर्वांच्या काळजाला जाऊन भिडणं 
त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात जुन्या साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती
कधी आठवतो वाफाळलेला चहा तर
कधी आठवतं सोबत असलेलं ते कवितेचं पुस्तक
तर कधी आठवतं ते नुसतं बसून त्याला न्याहाळलेलं एकटक
कधी आठवते गरम भजी वडा अन् मित्रांसोबत केलेली ती धमाल
तर कधी आठवतं गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल
कधी आठवते उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री
कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळं काढून बघण्याचे
काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच की हिवाळे अन् उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातंच ना मी पाहीलेत इतके पावसाळे

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव