Nojoto: Largest Storytelling Platform

*भा. सा. व सांस्कृतिक मंच नागपूर आयोजित काव्य लेखन

*भा. सा. व सांस्कृतिक मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम*

*काव्य प्रकार _अभंग लेखन*


*विषय _दिनू सोनियाचा*


आळंदी देवाची/ संजीवन धाम /
घेत हरिनाम/ ज्ञानेशाचे//१

वद्य त्रयोदशी /दिनू सोनियाचा/
कार्तिक मासाचा/समाधीचा//२ 

इंद्रायणी काठी/ उत्सव चालला/
भक्तांचा लोटला/ महापूर//३

ज्ञानदेवा दिली /भाषेची मराठी/
सर्व जनासाठी/ ज्ञानेश्वरी//४

साहित्य महंत/ सामर्थ्य भाषेचे /
रुप लालित्येचे / दावियले//५

पसायदान हे/ विश्व कल्याणासी/ 
हेच देवापाशी/ मागितले //६

ज्ञानाची महती / ज्ञानेश्वरी जशी/ 
चौदाव्या त्या वर्षी/ पुर्ण केली//७ 

विठ्ठल दैवत / गुरु हे निवृत्ती/
जागवी प्रवृत्ती/  त्यांचे ठाई //८

विचार ज्ञानाचे/ करु अवगत/ 
प्रकाश सांगत / महतीचे //९ 



डॉ.प्रकाश पांडे
वाशीम

©Mohan Somalkar
  #अभंग