आयुष्याच्या प्रवासात कोनीतरी मला ही साथ द्यावी । मी तीचा सखा अन् ती माझी सखी बनुन रहावी ।। आयुष्याच्या वाटेवरती कोनीतरी मला योग्यमार्गाने चालवावे । मी कोनाचा असो वा नसो पण तो / ती व्यक्ती माझी बनुन रहावे ।। जिवनाच्या खडतर प्रवासात कोनीतरी नकळत साथ द्यावी । शुभ्र रंग सामावतो तशी ती ही माझ्यात सामावावी ।। माझ्या सार्थकतेत तीचाही मनापासुन सहभाग असावा । ती जवळ नसतानाही तीचा चेहरा प्रत्येकाला माझ्या डोळ्यात दिसावा ।। तीच्या व माझ्या आयुष्याच्या प्रवासाचे सदैव नाते असे असावे । ती माझी राधा अन् मी तीचा कृष्ण हे संबंध सतत मी व तीने जपावे ।। ✒ अमोल वाघमारे (मनाचा राजा) #राधा#कृष्ण#प्रेयसी#प्रियकर#प्रेम#प्रेमीका