Nojoto: Largest Storytelling Platform

White #निरोप घेतो जगा.... शब्दवेडा किशोर निरोप घे

White #निरोप घेतो जगा....
शब्दवेडा किशोर 
निरोप घेतो जगा आता आज्ञा असावी
चुकले हुकले काही माझे त्याची क्षमा असावी......
वेळ भरली माझी आता माझा अंतःकाळ जवळ आला
हसतच मज न्याया बघा तो काळ दारी उभा राहीला......
आजवर खुप छळले मी तुम्हा सर्वांना
मेल्यावरही शाप देऊ नका माझ्या आत्माला ही विनंती तुम्हाला......
शेवट माझा गोड व्हावा ही इच्छा तुम्ही धरा
नवा जन्म मज चांगला मिळो ही देवास कामना करा......
या जन्मी तुम्हा कुणासच मी सुख नाही कधी दिले
हे कर्ज आहे सदा माझ्या डोई
घेईन नवा जन्म फेडेन तुमचं कर्ज होईन त्यातून उतराई......
शापीत हा जन्म गेला त्याचा राग नाही मला
घेऊनी नवा जन्म फेडण्या तुमचे कर्ज
तो सर्वसुखे जगण्याचा ध्यास जिवासी लागला......

©शब्दवेडा किशोर #sad_shayari  जीवन प्रवास