White आता थोडे बोलू काही.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम असेल नाही माहित रात्र अजुनही बाकी आहे आता थोडे बोलू काही ll१ll जीवन कठीण गाणे सूर जरासे जुळले आहेत दूरवर चालायचे तर आहे आता थोडे बोलू काही ll२ll रिमझिम पाऊस येतो आहे गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही ll३ll वळण अजून दूर आहे आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही ll४ll वाटते सुख दुःखात साथीदार असावा जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आपण आता थोडे बोलू काही ll५ll ©शब्दवेडा किशोर #sad_quotes लाईफ कोट्स