Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवा🪔 एक🪔 संत गाडगेबाबाचा त्यांनी स्वच्छतेच

एक दिवा🪔

एक🪔 संत गाडगेबाबाचा 
त्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला!
एक 🪔 संत तुकडोजीचा
ग्रामगीतेतुन गीतासार सांगितला! 
एक 🪔 बाबा आमट्यांचा 
कुष्टरोंग्याना आसरा दिला! 
एक🪔 सिंधुताई सपकाळचा
अनाथांना आश्रयाचा हात दिला!
एक 🪔 आचार्य विनोबा भावेंचा
भुमीहिनांना भुमीचा तुकडा दिला!
एक🪔 डाॅ. बाबासाहेबांचा
समता,बंधुभाव, संघर्षाचा महामंत्र दिला
एक 🪔 ज्योतिबाचा 
सत्यशोधक समाज घडविला! 
एक 🪔 सावित्रीबाईचा 
स्त्री साक्षरतेचा रस्ता दाखविला !
एक 🪔 म. गांधींचा
सत्य,अहिंसा, सत्याग्रहाचा मार्ग दाखविला.!

असे अनेक दिवे🪔 देशाला तेज देऊन गेले. तरी माणुसकीचा का अंधार दिसतो आहे. 
नातवा, गोतवाचा माणूसही आज 
रस्ता प्रकाशात का  भटकतो आहे ?

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  # दिवा

# दिवा #मराठीकविता

663 Views