White भेद शब्दवेडा किशोर नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१|| तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला पेशी एक एक असे नियमात बांधलेला ||२|| त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक ||३|| मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने ||४|| त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ ||५|| रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६|| ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून