Nojoto: Largest Storytelling Platform

चिऊताई बसुनी गॅलरीमध्ये काल,मी बघत होते आकाशाकडे

चिऊताई


बसुनी गॅलरीमध्ये काल,मी बघत होते आकाशाकडे...
नजरेस पडली एक चिऊताई,जात होती ती,तिच्या घरट्याकडे..

चोचीमध्ये घेऊन दाना,ती घाई घाईत उडत होती...
तिच्या पिल्लांना बघण्याची जणू,तिला आतुरता लागली होती...

तेव्हढ्यात आकाशातून पडली ,तिच्या अंगावर पावसाची धार...
तरी उडत होती ती,मानली नाही तिने हार...

झाली होती ओली पूर्ण,पंखपण भिजले होते...
तरी तिचे उडणे ,बंद झाले नव्हते.....

तेवढयात जोराचा ,वारापण सुरू झाला....
चिऊताई चा वाऱ्यामुळे ,तोल होता गेला....

परत उठली ती,आणून पंखामध्ये जीव...
त्या क्षणी येत होती,मला तिची कीव...

उघडूनी पंख पुन्हा एकदा,झेप घेतली तिने घरट्याकडे...
पोहचूनी घरी तिने,धाव घेतली पिल्लांकडे....

चारूनी त्यांना दाना पाणी,पिल्लांना कुशीत तिने घेतले...
आनंदाने मग तिने ,स्वतःचे डोळे मिटले...

सकाळी पुन्हा एकदा ती,मला आकाशात उडतांना दिसली.
तिची जिद्द पाहून मी,तिच्यापुढे झुकली..

ऐका छोट्याश्या जीवने कल मला,खूप काही शिकवले...
हार न मानता अडचणींना,जिद्दीने कस लढायच ते दाखविले..

©Priyanka Jaiswal
  #चिऊताई