Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींना आठवलं नाही असा क्षण मला आठवत नाही.. आठव

 आठवणींना आठवलं नाही
 असा क्षण मला आठवत नाही..
आठवलेलं सगळंच काही 
डोळ्यात मात्र साठवत नाही..

सांगायच बरच असतं
 सांगावं  कसं कळत नाही..
कळवलेलं कळूनही तुला
तुझ्या सोयीने ते वळत नाही..

आठवणींचा येऊनही पुर 
नयनातूनी आसवे गळत नाही..
दूर राहुनी दुराव्याचे
गणित काही जुळत नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा