#ग्रामपंचायत निवडणूक गेल्या काहि दिवसांपासून सगळीकडेच ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग चालू आहे. प्रत्येक पॅनल, प्रत्येक उमेदवार अगदी जोर लावून प्रचार करत आहे. खरतर आजच्या निवडणुकांचे हे चित्र बघता ग्रामपंचायत हे जनकार्याचे, विकासकार्याचे मंदिर आहे की कुस्तीचा आखाडा ?? हेच कळणा झालय. कशासाठी हा इतका खटाटोप... पदासाठी ?? आणि पद लागतंय तरी कशासाठी... कार्यासाठी ?? पण खरच कोणत्याही कार्यासाठी पदाची गरज असते का ?? अहो अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पदे नव्हती पण केवळ निस्वार्थी भावनेने केलेल्या समाज कार्यामुळे आजही ते जनसामांच्या मनावर राज्य करताय... उदाहरण घेयच ठरलंच तर संत गाडगे बाबांच घेता येईल ज्यांनी स्वच्छतेच महत्व पटवून दिलं त्यासाठी त्यांनी स्वताही झाडू हातात घेतला. आजचे स्वच्छता मंत्री कोण ?? अस विचारलं तर लवकर सांगता येणार नाही पण स्वच्छतेचे जनक कोण ?? अस म्हंटल की आपसुकच संत गाडगेबाबांच नाव ओठांवर येत. दुसरं उदाहरण सावित्रीमाई फुलेंच घेता येईल. त्या काही शिक्षण मंत्री नव्हत्या पण स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेली धडपड आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशी एक ना अनेक उदाहरणं घेता येतील ज्यांनी कोणत्याही पदाशिवाय समाजाला खूप काही दिलं. तेव्हा फक्त पदासाठी लढण्यापेक्षा निस्वार्थी भावनेने समाजाला अस काही द्या, की समाजाने तुम्हाला चिरंतर स्मरणात ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या कोणतही पद तुम्हाला फक्त काही काळासाठी मान सन्मान देत. पण निस्वार्थी भावनेन केलेलं कार्य तुम्हाला नेहमीच मान, सन्मान, आनंद आणि समाधान देईल. बघा पटतंय का... धन्यवाद !! ©Prasad Gite #OurRights