Nojoto: Largest Storytelling Platform

White शब्द शब्दच सुख,शब्दच दुःख, शब्दच आहे भावना.

White शब्द

शब्दच सुख,शब्दच दुःख,
शब्दच आहे भावना..
शब्दातच आयुष्य आपले,
सामावले आहे रे मना...

शब्दच हसवतात, शब्दच रडवतात,
शब्दच घेतात परीक्षा आयुष्याची..
शब्दाविना व्यर्थ सर्व,
नाही मजा जीवन जगण्याची..

शब्दच आहे प्रेम,शब्दच द्वेष आहे,
शब्द म्हणजे देवाने,आपल्याला दिलेले वरदान आहे..

म्हणून वापरा शब्द जपून आपले,
दुखऊ नका कोणाचे मन..
आयुष्यात परत येणार नाही,
निघून गेलेले क्षण..

©Priyanka Jaiswal
  #शब्द