Nojoto: Largest Storytelling Platform

तिने मात्र हसायचंच असतं कधी हसायचं कधी रडायचं तिन

तिने मात्र हसायचंच असतं

कधी हसायचं कधी रडायचं तिने
सारंच ठरवून ठेवायचं असतं
नात्यांना समजवून घेऊन
भावनांना थांबवायचं असतं

शब्दांमधील खेळांमध्ये
प्रत्युत्तर मात्र करायचं नसतं
दुखले-रुसले मन तरीही
तिने मात्र दुखवायचं नसतं

निमूटपणे सहन सारेच करत
तिने मात्र हसायच असतं
ओंजळीतील क्षणिक सुखावरती
आयुष्य सारं काढायचं असतं

तडजोड करण्यात आयुष्य संपतं
पिल्लांपुढे भानच नसतं
कधी स्वत:ला न्याहळत मग
सरलं आयुष्य पानावर उतरतं

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  तिने मात्र हसायचं असतं

तिने मात्र हसायचं असतं #मराठीकविता

107 Views