Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिलंय मी स्वतःला, स्वतःच्या सावलीसोबत बोलताना, अ

पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या सावलीसोबत बोलताना,
अगणित तारे गगनी,
तरीही त्यांना मोजताना ........!
                               पाहिलंय मी स्वतःला,
                               स्वतःच्या स्वप्ननासोबत चालताना,
                               अपूर्ण सारी विस्कटलेली,
                               तरीही सोबत घेऊन फिरताना .......!
पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या असण्यावर हसताना,
त्रास होत असेल,
उभा आराश्यासामोर असताना ......!
                                पाहिलंय मी स्वतःला,
                                स्वतःच्या आयुष्यात जगताना,
                                आनंदी राहण्यासाठी,
                                सुख काय असतं शोधताना ......!
पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या हातून हारताना,
दुसऱ्यांच्या बगीच्या फुलवता,
स्वतःमात्र कोमजता.....!
                       मयुरमेश
                     २८-०५-२०१९
पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या सावलीसोबत बोलताना,
अगणित तारे गगनी,
तरीही त्यांना मोजताना ........!
                               पाहिलंय मी स्वतःला,
                               स्वतःच्या स्वप्ननासोबत चालताना,
                               अपूर्ण सारी विस्कटलेली,
                               तरीही सोबत घेऊन फिरताना .......!
पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या असण्यावर हसताना,
त्रास होत असेल,
उभा आराश्यासामोर असताना ......!
                                पाहिलंय मी स्वतःला,
                                स्वतःच्या आयुष्यात जगताना,
                                आनंदी राहण्यासाठी,
                                सुख काय असतं शोधताना ......!
पाहिलंय मी स्वतःला,
स्वतःच्या हातून हारताना,
दुसऱ्यांच्या बगीच्या फुलवता,
स्वतःमात्र कोमजता.....!
                       मयुरमेश
                     २८-०५-२०१९
mayurlangi7821

Mayur Langi

New Creator